मोहम्मदरफी फॅन क्लब, तळेगाव आयोजित सिने संगिताने रसिकश्रोते आनंद सागरात चिंबचिंब भिजले

मावळ मराठा न्यूज़, तळेगाव:- महान गायक स्वर्गीय मोहम्मदरफी फॅन्स क्लबची स्थापना २००७ या वर्षी कडोलकर कॉलनीत श्री राजेंद्र जगताप श्री सतीश देशपांडे यांच्या पुढाकाराने झाली.पुढे त्यांना श्री बापू व्यास श्री सुभाष वाळुंज श्री वैशाल शहा कविवर्य राम अत्रे, निवेदक अनिल धर्माधिकारी, उत्कृष्ट शायरी सादर करणारे राधेश्याम भंडारी, श्री मोकाशी असे सहयोगी लाभलेत.२०१० या वर्षापासून भक्कम आर्थिक सहकार्य करणारे सूर्यकांत काळोखे, ब्रीजेंद्र किल्लेवाला याबरोबरच चिंचवडचे सुरेश काळे,रमेश जावळे सारखे समविचाराचे श्रोते आणि गायक येऊन मिळालेत. मै अकेलाही चला था जानीबे मंजिल मगर, लोग आते गये और कारवा बनता गया,या शायरी प्रमाणे आनंदाचे डोही आनंद तरंग,अनुभवणारा हा रसिक आणि गायकांचा ग्रुप जमला आणि २००७ या वर्षी या ग्रुपला डॉक्टर शालिग्राम भंडारी यांचेकडून नाव दिलं गेलं. “मोहम्मदरफी फॅन क्लब’यावर्षी रविवार दिनांक ३१ जुलैच्या संध्याकाळी- माजी अध्यक्ष श्री सूर्यकांत काळोखे,बिरजूभाई किल्ले वाला, विद्यमान अध्यक्ष श्री नितीन खळदे,कमिटी प्रमुख श्री बाळासाहेब लोणकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वासराव देशपांडे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून या संगीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर प्रत्येक गायकांनी उत्कृष्ट गायनातून आपली हजेरी लावली,त्यात सुभाष वाळुंज, अमोल बर्वे, संतोष दाभाडे,वैशल शहा, श्री सुरेश काळे वगैरे पुरुष गायक तसेच गायिकामध्ये सोनाली यादव, वरदा मातापुरकर आणि सौ ज्योती देशपांडे यांनीही आपली उत्कृष्ट गाण्यातून हजेरी लावली. ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री अशोक काळोखे, ज्येष्ठ पत्रकार अमीन खान,श्री निलेश गराडे, श्री महेशभाई शहा, एडवोकेट श्रीराम कुबेर यां मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला. यानंतर बार्शी सोलापूरहुन खास या कार्यक्रमासाठी सहपरिवार आलेले श्री सुनील फल्ले यांनी सादर केलेल्या” शोधीशी मानवा रावळी देवळी” या भक्ती गीताने संपूर्ण कार्यक्रमाचं केलेलं भक्तिमय विशेष वातावरण. याबरोबरच महाराष्ट्र मॅरेथॉन स्पर्धेत प्राविण्य प्राप्त विभावरी बर्वेचा यथोचित केलेला सत्कार ,प्रसिद्ध निवेदक अनिल धर्माधिकारी यांची नात कु. शांभवीने प्लास्टिक निर्मूलनासाठी केलेले निवेदन, श्री विजय चौधरींनी सांभाळलेली संगीताची उत्कृष्ट बाजू, प्रत्येक गायकाने समरसून सादर केलेली आपली गायकी, ज्येष्ठ डॉ शालिग्राम भंडारी यांनी आपल्या शेरोशायरीतून समारंभात आणलेली रंगत, कलापिनीचे सर्वेसर्वा डॉक्टर आनंद परांजपे यांनी कलाकाराच तोंडभरून कौतुक केले . रो. अध्यक्ष सुरेश शेंडे,ला. अध्यक्ष डॉ अनिकेत काळोखे यांचा क्लबने केलेला यथोचित सत्कार अध्यक्ष नितीन खळदे कमिटी चेअरमन श्री बाळासाहेब लोणकर क्रियाशील कार्यकर्ते बशीर पठाण आणि संवेदनशील व्यक्तिमत्व बाबा चौरे अशा क्लबच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली विशेष मेहनत. बहुआयामी व्यक्तिमत्व डॉ केदार वळसंगी करांनी सादर केलेले उत्कृष्ट संचलन, ही या रंगलेल्या मैफिलीची वैशिष्ट्ये होती. संत ज्ञानेश्वरांच्या ओवी प्रमाणे इवलेसे रोप लावियले दारी,त्याचा वेलू गेला गगनावरी.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page