रोटरी क्लब ऑफ मावळतर्फे प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.ईश्वर झंवर यांना मावळ हेल्थ आयकॉन पुरस्कार



मावळ मराठा न्यूज़ ,तळेगाव, रोटरी क्लब ऑफ मावळतर्फे नुकत्याच झालेल्या डॉक्टर्स डे चे औचित्य साधून प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर ईश्वर झंवर यांना रोटरी मावळतर्फे देण्यात येणाऱ्या ‘मावळ हेल्थ आयकॉन अवॉर्ड’ने लायन्स हॉलमध्ये शनिवार दिनांक ८ जुलै २०२३ रोजी सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याला ज्येष्ठ डॉ.अनंत परांजपे हे प्रमुख अतिथी आणि ज्येष्ठ लायन शाळीग्राम भंडारी हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.सन्मानार्थी डॉ.ईश्वर झंवर तसेच डॉ.दिपाली झंवर डॉ.अश्विनी परांजपे आय ॲम ए अध्यक्ष डॉ निलेश नारखेडे आदी मान्यवर डॉक्टर्स उपस्थित होते. डॉ.दिपाली यांनी आपले पती डॉ.ईश्वर यांचा जीवन प्रवास उलगडत आयोजकांचे आभार मानलेत. खंडेराय पगडी, पंचा, सन्मानचिन्ह ,डॉ ईश्वरसरांचे पेंटिंग व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. डॉ ईश्वर यांनी रोटरी क्लबविषयी कृतज्ञता व्यक्त करताना सर्वप्रथम रोटरीक्लब ऑफ मावळचे आभार मानले. इतक्या कमीवयात आपल्या क्लबने मला सन्मानित केल्याने माझी सामाजिक जबाबदारी निश्चितच वाढली आहे असे उद्गगार ईश्वर यांनी काढले.अध्यक्ष रो.सुनील पवार यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर सेक्रेटरी रो.रेशमा फडतरे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सादर केली.रो.दादासाहेब उर्हे यांनी मानपत्राचे वाचन केले,सूत्रसंचालन रो.विजय कुलकर्णी यांनी केले. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोक काळोखे, डोळसनाथ पतसंस्थेचे चेअरमन श्री राहुल पारगे यांची विशेष उपस्थिती या समारंभास लाभली . रो.मनोज ढमाले यांनी उपस्थितांचे आभार मानलेत. याच समारंभात मावळ रोटरी आंतरराष्ट्रीय संघटनेत रोटरियन महेश बुटाला, सुभाष सूर्यवंशी आणि अशोक गुळवे या तीन नवीन सभासदांचे पदार्पण झाले. मानपत्राचं शब्दांकन करणारे रो.राजेश गाडे पाटील यांचा यथोचित सन्मान डॉक्टर शालिग्राम भंडारी आणि डॉ आनंद परांजपे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. समारंभाच्या यशस्वीतेसाठी रो दिपक चव्हाण,रो.रवी घारे,रो.नितीन घोटकुले,रो. डॉ.गणेश कोल्हे,रो.डॉ.अमिता पाटील,रो.पूनम देसाई,रो. डॉ.रोहित मनीयार,रो.डॉ अशोक तोडकर,रो.संदीप बोडके,रो.अमोल नरावडे,रो.मयूर गायकवाड,रो.रवींद्र नहाळदे,रो.रुपेश चव्हाण,रो. विशाल चव्हाण,रो.अक्षय दाभाडे,रो.सुनील वाळुंज, रो.अशोक गुळवे,रो.महेश बुटाला,रो. शशिकांत हळदे,रो.सुभाष सूर्यवंशी,रो.सुनील महाजन आदीं रोटेरियन सभासदांनी विशेष परिश्रम घेतले .




