बेकायदेशीरपणे दारूची विक्री आणि वेळेचे बंधन न पाळणाऱया चौघा विरोधात लोणावळा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

मावळ मराठा न्युज:- लोणावळा – दि. १७/१२/२०२३ रोजी यातील आरोपी मजकूर धनंजय सुरेश जाधव रा. वलवन लोणावळा ता. मावळ जि. पुणे, (२ ) शिवेंद्र प्रतापसिंग, रा. ,लोणावळा यांनी बेकायदेशीरपणे दारूची विक्री करून बार चालू ठेवून आरोपी तेजस सुरेश दुबे, राहणार, नगरपालिका दवाखान्यासमोर, लोणावळा आणि अजय संतोष नलावडे राहणार ओळकाईवाडी,कुसगाव, लोणावळा, तालुका मावळ,जिल्हा पुणे यांना दारूची एकुन १५०० रुपये किमतीचा मालाची म्हणजे विदेशी दारूची विक्री केली म्हणून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ प्रमाणे व एस एम बार मर्यादे पेक्षा जास्त वेळ चालू ठेवून जिल्हादंडधिकारी सो यांच्या आदेशाचा भंग केला म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम प्रमाणे सरकारतर्फे फिर्याद आहे. लो.श.पो.स्टे.गु.रजि.नं.५७८/२०२३ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ६५ e महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ३३ W गुन्हा संदीप पंढरीनाथ घोटकर वय ४० वर्ष व्यवसाय नोकरी, पोलीस हवालदार बक्कल नंबर 1883 नेमणूक लोणावळा शहर पोलीस स्टेशन लोणावळा गुन्हा रजिस्टर दाखल करून हुजूर कोर्ट सो यांना गुन्ह्याचा प्रथम वर्दी रिपोर्ट रवाना करून दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक मिस्त्री बक्कल नंबर २६ २६ हे करत आहे दाखल अंमलदार पोलीस हवालदार बक्कल नंबर २०२७ उंडे पुढील तपास पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांच्या मारदर्शनाखाली करीत आहेत.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page