आंदर मावळात अजित पवार गट राष्ट्रवादीचा.२९ डिसेंबर २०२३ ला स्नेह मेळावा


मावळ मराठा न्यूज:-टाकवे बुद्रुक : मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने फळणे फाटा येथे शुक्रवार दि.२९ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी ४.३० वाजता आमदार सुनिल शेळके यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी परिवार स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.आंदर मावळातील ज्येष्ठ नागरिक,महिला,बंधू भगिनी,आजी माजी लोकप्रतिनिधी,पक्षाचे आजी माजी पदाधिकारी,सर्व फ्रंटल सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत हा स्नेह मेळावा संपन्न होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गटाचे)तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी दिली. आंदर मावळ विभागातील सुदवडी,सुदुंबरे,जांबवडे,नवलाख उंब्रे,जाधववाडी,मिंडेवाडी,बधलवाडी,परीटवाडी,मंगरुळ, शेटेवाडी,शिरे,खुरसुलेवाडी,आंबळे,कदमवाडी,निगडे,कल्हाट,पवळेवाडी,कोंडिवडेभोयरे ,कशाळ,किवळे,पिचडवाडी, इंगळूण,पारीठेवाडी, मानकली, अनसुटे,कुणे, कुणेवाडी, माळेगाव खुर्द,पिंपरी,तळपेवाडी, माळेगावबु., सावळा, कळकराई, आढारवाडी,मेटलवाडी, गोंटेवाडी, ढोंगेवाडी, निळशी, निसाळवाडी, खांडी, कुसूर, मोरमारेवाडी, चिरेखान,लोहटवाडी,बेंदेवाडी,लालवाडी,डाहूली,कांब्रे,बोरवली,कुसवली,वहानगाव,नागाथली,शिंदेवाडी,घाटेवाडी,वडेश्वर,लष्करीवाडी,गभालेवाडी,डोंगरवाडी,सटवाईवाडी, धनगरपठार, माऊ,दवणेवाडी,फळणे,टाकवे बुद्रुक,बेलज,राजपुरी या गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या.त्यातील अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत.तालुकाध्यक्ष गणेश खांडगे म्हणाले,”मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट )च्या वतीने संकल्प दूरदृष्टीचा सर्वागीण विकासाचा ही थीम घेऊन आंदर मावळातील गावभेट दौरा घेतला होता.या दौऱ्यात स्थानिक गावकऱ्यांनी सार्वजनिक विकासाची कामे सुचवली होती.तसेच वैयक्तिक अडचणी,विविध शासकीय योजनांचा लाभ या विषयाचे प्रस्ताव दिले होते.या सर्व बाबींचा अहवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उपमुख्यंमंत्री अजित पवार व आमदार सुनिल शेळके यांना दिला होता.या अहवालातील विविध समस्यांची सोडवणूक झाली आहे.तर विविध विकास कामे मार्गी लागली आहे.पक्षाचे जिल्हा प्रदीप गारटकर,आमदार सुनिल शेळके,संत तुकाराम सहकारी साखर कारखाना चे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडेराष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे,माजी तालुकाध्यक्ष गणेश ढोरे,माजी तालुकाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे,संत तुकाराम सहकारी साखर कारखाना चे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे,कृषी संवर्धनाचे माजी सभापती बाबूराव वायकर, समाजकारणचे माजी सभापती अतिष परदेशी यांच्यासह मावळ तालुक्यातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आंदर मावळातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.




