लोणावळ्यात रहदारीला अडथळा आणि बेशिस्त वाहन पार्क करणाऱ्या ६३ जणावर कारवाई,४९ हजाराचा दंड

मावळ मराठा न्यूज़ :-लोणावला शहरात प्रादेशिक परिवहन विभाग ,लोणावला नगरपरिषद आणि लोणावला शहर पोलिस स्टेशन यांच्या संयुक्तिक रित्या जुना मुंबई पुणे महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात येणारे वाहनांवर कारवाई करण्यात आली.तसेच फ़ूड ट्रक अन्वये एका वाहनामधे खाद्य पदार्थ विक्री करणारे चालकंवर कारवाई करण्यात आली.महामार्गालगत लावण्यात येणाऱ्या फळ आणि खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्या हातगाड्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.नो पार्किंग मधे पार्क करणाऱ्या अश्या ३२ वाहन k चालकंवर केसेस करण्यात आल्या आहेत एकूण ६३ केसेस आणि ४९ हजार इतका दंड करण्यात आला . यापुढे लोणावला शहरात अनधिकृत फळे विक्रेते अन्न पदार्थ विक्रेते आणि बेशिस्त वाहन करणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे लोणावला उपविभागीय पोलिस अधिक्षक आय पी एस सत्यसाई कार्तिक यांनी मावळ मराठा न्यूज़ शी बोलताना सांगितले .सदरची कामगिरी आय पी एस सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस निरीक्षक सीताराम दुबल,लतीफ़ मुजावर वाहतूक विभागाचे शकील शेख ,अनिल शिन्दे,सचिन कडाले यांनी केलि आहे .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page