महाराष्ट्र राज्य युथ हॉस्टेल च्या अध्यक्षपदी वसईच्या आमदार स्नेहा दुबे यांची निवड







मावळ मराठा न्युज-लोणावळा मलवली येथील युथ हॉस्टेल येथे निवडणूक प्रक्रिया पार पडली. आंतरराष्ट्रीय युथ हॉस्टेल फेडरेशन, UK यांची मान्यता प्राप्त असलेल्या, भारतातील युथ हॉटेल्स असोसिएशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य शाखेच्या त्रैवार्षिक निवडणुकीत अध्यक्षा म्हणून वसई विधान सभेच्या लोकप्रिय आमदार स्नेहा दुबे पंडित यांची बिनविरोध निवड झाली.लोणावळा मळवली येथे युथ हॉटेल असोसिएशन ऑफ इंडिया या राष्ट्रीय संस्थेची महाराष्ट्र राज्य शाखेची सर्वसाधाराण सभा आज संपर्क बालग्राम मळवली लोणावळा येथे संपन्न झाली. सदर सभेला राज्यातील कौन्सिल सभासद विविध भागातून उपस्थित होते. सदर सभेत वसई आमदार स्नेहा दुबे यांच्या सोबतच पुढील पदाधिकाऱ्यांची एकमताने बिनविरोध निवड केली. उपाध्यक्ष पदी श्री प्रेमानंद रामपूरकर (यवतमाळ), श्री विश्वास सावंत (मालाड)आणि श्री राजेश भोसले. (नवी मुंबई) यांची, तर राज्य कार्यकारिणीच्या कार्याध्यक्षा म्हणून ॲडव्होकेट लक्ष्मी मोर्डेकर (हिरकणी) यांची निवड झाली. तसेच खजिनदार म्हणून श्री लक्ष्मण कोरगावकर (गोरेगाव) यांची निवड झाली. त्याचप्रमाणे श्री अनिल थोरात (ठाणे) यांची सचिव पदी तसेच मधुमिता देशपांडे (हिरकणी) यांची संघटक सचिव या पदी निवड झाली. सदर निवडणुकी साठी राष्टीय कार्याध्यक्ष श्री रश्मिकांत चिपा यांनी संपर्कचे प्रमुख अमित कुमार बॅनर्जी यांची निवड केली होती. निवडणूक प्रक्रिये नंतर संपर्क संस्थापक आणि युथ हॉटेलचे आजीव सभासद श्री अमित बॅनर्जी सरानी निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान केला.



