आधार स्तंभ दिव्यांग फाउंडेशन च्या वतीने जागतिक महिला दिन गुणगौरव सोहळा थाटात संपन्न

मावळ मराठा न्युज :- लोणावळा,आधार स्तंभ दिव्यांग फाउंडेशन च्या संचालीका मयूरीताई बोत्रे यांच्या विशेष प्रयत्नांतून लोणावळा मावळ येथे “आधार स्तंभ दिव्यंग फाऊंडेशन “तर्फे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती मिनाक्षी कुमकर,योगा प्रशिक्षीका सौ.शोभना गवस,राष्ट्रवादी महिला अध्यक्षा लोणावळा सौ.उमा मेहता,नॅशनल इन्शुरन्स कंपनीचे मुकेश परमार,दिव्यांग मार्गदर्शक,श्री.तानाजीभाऊ मराठे दिव्यांग सेल पुणेचे कार्याध्यक्ष श्री.गणेशभाऊ शेडगे,रा.काॅ.दिव्यांग सेल तळेगाव शहर अध्यक्ष सौ.ज्योतीताई भरत राजिवडे, रा.काॅ.पा.सांस्कृतीक विभाग मावळ तालुका अध्यक्ष श्री. भरत उर्फ नाना राजिवडे,विवीध क्षेत्रातील महिलांचा सन्मान चिन्ह व एक झाड देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास पत्रकार बांधव , महिला भगिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.सदर कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय, शाळा क्र. १, लोणावळा येथे संपन्न झाला.आधार स्तंभ दिव्यांग फाऊंडेशन यांच्यावतीने जागतिक महिला दिन गुणगौरव सोहळा सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती मिनाक्षी कुमकर यांच्या प्रमुख उपास्थितीत मोठ्या थाटात संपन्न झाला,यावेळी योगा प्रशिक्षीका पुणे येथील सौ. शोभना गवस,मुकेश परमार,राष्ट्रवादी महिला अध्यक्ष लोणावळा सौ.उमा मेहता महात्मा फुले अपंग केंद्राचे गणेश जगताप, राजु हिरवे, गणेश रोहमारे,रंगनाथ वरे,गिरीधर पाटणकर, अनुराधा आंबेडकर,सुधिर पाटणकर, संतोष राजवाडे, रमेश बोंद्रे,यशवंत पायगुडे,भारती पवार,विकास लिंबोरे, संदिप भोसलकर, नरेश खोंडगे,तुषार देशमुख,शितल जगताप आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आधार स्तंभ दिव्यांग फाऊंडेशन च्या संचालिका मयुरी बोत्रे,सचिव अनिल सुर्यवंशी, राजेश दिवटे,तानाजी मराठे,लहु गायकवाड,सुभाष रोडगे, दर्शन गायकवाड,कुणाल कालेकर,हरिश्चंद्र गायकवाड,सौ. निकिता दिघे,तन्वी गायकवाड यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page