बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या इसमास अटक,एक गावठी पिस्टल जीवंत राऊंड सह ३५ ,५०० /-रुपये किमतीचा माल जप्त


मावळ मराठा न्युज:-लोणावळा, दिनांक २७/१२/२०२३ लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनची कारवाई,बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या इसमास पकडून एक गावठी पिस्टल व एक जीवंत राऊंड असा एकण ३५ ,५०० /- रुपये किमतीचा माल जप्त.मा. श्री. अंकीत गोयल सो, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण व मा. श्री. मितेश गट्टे सो, अपर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये विनापरवाना शस्र बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सुचना सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. किशोर धुमाळ यांनी श्री. सत्यसाई कातॉक सो, सहा. पोलीस अधीक्षक लोणावळा विभाग लोणावळा यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले यांचे अधिपत्याखाली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विनापरवाना शत्र बाळगणा-या इसमांवर कारवाई करणेकरीता पथक नेमले.दिनांक २६/१२/२०२३ रोजी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. किशोर धुमाळ यांना त्यांचे विश्वासातील बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक इसम स्वतःचे जवळ विनापरवाना पिस्टल घेवूनफिरत असुन तो आज रोजी वरसोली येथील कचरा डेपोचे परीसरात भारत गॅस गोडाऊन जवळ येणार आहे, अशी खात्रीशीर बातमी मिळताच वरीष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी सदर बाबत पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले यांना मिळाले बातमीचा आशय व छापा कारवाईचा प्लॅन सांगून कारवाईचे आदेश दिले, त्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले हे तात्काळ त्यांचे सोबत असणारे स्टाफसह भारत गॅस गोडावून वरसोली येथे रवाना झाले. तेथे बातमीतील वर्णनाचा एक इसम उभा असलेला दिसला. त्यास पोलीसांची चाहूल लागताच तो तेथून पळून जावू लागला त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले यांच्या पथकाने अतिशय कुशल रितीने सदर इसमाचा पाठलाग करुन त्यास काही क्षणातच त्याब्यात घेतले. त्यावेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यातून गावठी बनावटीचे एक पिस्टल व एक जीवंत राऊंड असा एकुण ३५ ,५०० /- रुपयाचा माल हस्तगत करुन जप्त केला आहे. सदर बाबत लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं. ६९८ /२०२३ भारतीय हत्यार कायदा कलम ३ ,२५ प्रमाणे आरोपी अविनाश उर्फ अवि कैलास आंबेकर वय २६ वर्षे राहणार देवळे तालुका मावळ जिल्हा पुणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर कारवाईमध्ये मा. श्री. अंकीत गोयल सो पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मा. श्री. मितेश गट्टे सो अपर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मा. श्री. सत्यसाई कार्तीक सो सहा. पोलीस अधीक्षक लोणावळा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री. किशोर धुमाळ वरीष्ठ पोलीस निरीक्षक लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या अधिपत्याखाली पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस हवालदार विजयकुमार मुंढे, पोलीस हवालदार नितीन कदम, पोलीस हवालदार संतोष शेळके, पोलीस नाईक गणेश होळकर, पोलीस नाईक भुषण कदम, पोलीस नाईक किशोर पवार, पोलीस अंमलदार संजयदादा पंडीत, पोलीस अंमलदार सिद्धेश्वर शिंदे, पोलीस अंमलदार ऋषीकेश पंचरास यांनी सहभाग घेतला असुन तपासात सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे मा. पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण व सहा. पोलीस अधीक्षक सो लोणावळा विभाग यांनी अभिनंदन केले आहे.




