शिबिरात २५० जणांची नेत्र तपासणी ६५ जणांची होणार मोतीबिंदू शस्त्रक्रिया

मावळ मराठा न्यूज:- चिंचवड,(प्रतिनिधी) श्री अग्रसेन ट्रस्ट हॉस्पिटल चिंचवड- प्राधिकरण व लखमीचंद आर्य सोशल वेलफेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात २५० जणांची तपासणी केली तर यापैकी ६५ जणांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केली जाणार आहे. चिंचवड येथील अग्रसेन भवन येथे आयोजित या शिबिराचे उदघाटन नेत्र तपासणी साठी आलेले ज्येष्ठ नागरिक वसंत पतंगे आणि सरिता गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री अग्रसेन ट्रस्ट चिंचवड प्राधिकरणचे अध्यक्ष सुनील रामेश्वर आगरवाल, मेडिकल कमिटीचे अध्यक्ष सीए के एल बंसल, विनोद मित्तल ,सुनील ज. आगरवाल,गौरव आगरवाल,विकास गर्ग,डॉ संतोष आगरवाल, लखमीचंद आर्य सोशल वेलफेअर फाऊंडेशनचे संचालक राजपाल आर्य,अरविंद आर्य, आयुर्वेद रुग्णालयाच्या डॉ.चंदना वीरकर,डॉ.मनिषा पिंगळे,डॉ.संदीप दारुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.अध्यक्ष श्री.आर्य म्हणाले कि,लखमीचंद आर्य फाउंडेशन च्या माध्यमातून आम्ही रुपीनगर आणि ट्रांसपोर्ट नगर या दोन ठिकाणी गेली १० वर्षांपासून गोरगरिबांना मोफत वैद्यकीय सेवा देत आहोत.यावेळी अध्यक्ष सुनील रा. आगरवाल म्हणाले कि, इमारत उभी करणे सोपे आहे, मात्र उभारण्यात आलेल्या इमारतीचा सदुपयोग होणे हे महत्त्वाचे आहे. आज आयोजित केलेल्या शिबिरासाठी या इमारतीचा पुरेपूर उपयोग होत आहे. हि महत्वपूर्ण बाब आहे. अग्रसेन ट्रस्टच्या माध्यमातून १५ वर्षांपासून आम्ही मोफत वैद्यकीय सेवा देत आहोत.आणि यासाठी डॉ. संतोष आगरवाल हे मोफत वैद्यकीय सेवा देत आहे. हि कौतुकास्पद बाब आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप पाठक तर आभार के एल बंसल यांनी मानले.




