श्री गणेश मूर्तिकला कार्यशाळेतून वाळंज विदयालयात साकारले गणपती;गणेश उत्सवातून आपली संस्कृती आणि समाज एकत्र येतो -प्रीती खुटाडे

मावळ मराठा न्युज -आंबवणे,सोनू अनाजी वाळंज माध्यमिक विद्यालय आंबवणे येथे विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण पूरक श्री गणेश मूर्ती निर्माण करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.हा उपक्रम मा. मंदाकिनी त्रिवेदी शक्तियोग आश्रम व मा. वत्सलाताई वाळंज अध्यक्षा जाई वात्सल्य फाउंडेशन यांच्या सहकार्यातून आयोजित केला.या प्रसंगी आंबवणे केंद्राच्या शिक्षण केंद्र प्रमुख सौ प्रीती खुटाडे मॅडम, मीरा जोशी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री भटू देवरे अनेरी शेठ मान्यवर उपस्थित होते. गणेशोत्सव म्हणजे केवळ उत्सव नाही… तो आपल्या संस्कृतीला जोडणारा आणि समाजाला एकत्र आणणारा उत्सव आहे. विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणासाठी मातीच्या गणपती स्थापने करिता प्रयत्न करावे असें मत आपल्या मार्गदर्शनात केंद्र प्रमुख मा. प्रीती खुटाडे यांनी व्यक्त केले. मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला.आजच्या पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनवण्याच्या कार्यशाळेत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. आपल्या हातांनी बाप्पाची मूर्ती घडवताना त्यांनी पर्यावरण रक्षण सामाजिक सलोखा जोपसण्याचा सुंदर प्रयत्न केला.श्री गणेशाच्या प्रतिमेचे पूजन केले. अनेरी शेठ मॅडम यांनी श्री गणेशाच्या सर्वांगाचे महत्व विषद केले. संजय कुलथे यांनी सूत्रसंचालन करून कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. रवींद्र सोनवणे, बाळासाहेब खेडकर, राहुल आवळे, विजय दळवी, शालिनी देवरे, संतोष दळवी, महादेव खेडकर, मंदा दळवी, अरुणा दळवी यांनी कार्यक्रम पारपडण्यास मदत केली. स्नेहभोजनाने कार्यक्रम पूर्ण केला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page