वडगांव पोलिसांची कामगिरी,जुगार मटका खेळणाऱ्या ७ जणावर पोलिसांची कारवाई


मावळ मराठा न्युज वडगांव :- दिनांक २२/१२/२०२३ रोजी १७:०० वाजता मौजे वडगाव फाटा येथील हाँटेल जोर्तीलिंगचे जवळ उंबराळी अँटो गँरेज मध्ये ता. मावळ जि पुणे येथे १) रविंद्र मोरेश्वर हवालदार वय ८१ वर्षे धंदा मजुरी रा.माचीकर याचे भाड्याचे रुममध्ये चावडी चौक वडगाव ता मावळ जि पुणे २) राम चंद्रपाल बहादुर वय ३० वर्ष धंदा,हमाली, ३) राजेंद्र कामताप्रसाद कुमार वय ३० वर्षे धंदा मजुरी, ४) रकिश लालजी विश्वकर्मा वय २८ वर्षे धंदा मजुरी तिघेही रा.राजु म्हाळस्कर याचे भाड्याचे खोलीत मोरया कॉलनी,वडगाव, ता. मावळ जि पुणे, ५) शंकर उर्फ सुनिल मारुती कुराडे वय ४५ वर्षे धंदा मजुरी रा.मोरया कॉलनी,वडगाव ता. मावळ जि पुणे ६) यल्लप्पा बसप्पा मुर्ती वय ४५ वर्षे धंदा मजुरी रा.माळवाडी चाकण एम आय डी सी रोड ता मावळ जि पुणे ७) विजयकुमार मारुती बनसोडे वय ३० वर्षे धंदा गँरेज कामगार रा.वाल्हेकरवाडी, चिंचवड, पुणे यातील रविंद्र मोरेश्वर हवालदार वय ८१ वर्षे रा.वडगाव ता मावळ जि पुणे हा लोकांचे कडुन पैसे घेवुन त्यांना कल्याण मटका जुगाराचे आकडे लिहिलेल्या तांबुस रंगाचे पावती पुस्तकातील तांबुस रंगाच्या चिठया देवुन कल्याण मटका जुगारीचे साहीत्य व रोख रक्कम रोख रक्कम – २६ ,३०० /- पेन,पावतीपुस्तक, बजाज डिस्कव्हर कंपनीची मोटर सायकल,हिरो स्पेलेंडर कंपनीची मोटर सायकल,ओप्पो कंपनीचा मोबाईल असे ७१ ,३०५ /- रू चे साहित्य मिळुन आले. त्यांचेविरुध्द महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे कायदेशिर फिर्याद आहे.गुन्हयाचे प्रथमवर्दी अहवालाची प्रत मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो वडगाव मावळ यांना रवाना करून गुन्हयाचा पुढील तपास पो हवा काळे/५५ हे करीत आहेत.




