लोणावळा शहर नि नागरिकांच्या हितासाठी आम्ही एकत्र आलो असे सांगत ५ वर्षे एकत्र सत्ता भोगलेले पुन्हा विकसितभारतच्या पार्श्वभूमीवर आमने सामने

मावळ मराठा न्युज :- लोणावळा,केंद्र सरकारच्या योजना आणि योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी शासनाकडून देशभरात विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.त्याचाच एक भाग म्हणून लोणावळा शहरात शुक्रवारी या यात्रेचे आगमन झाले. सकाळच्या सत्रात पुरंदरे मैदान येथे या यात्रेचा पहिला टप्पा होता यात सकाळी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि शेकडो नागरिकांनी विविध सुविधा आणि आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.त्याच दिवशी सायंकाळच्या सत्रात रेल्वे इन्स्टिट्यूट याठिकाणी यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होत असतानाच महाविकास आघाडीमधील काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या स्थानिय नेते आणि कार्यकर्त आणि पदाधिकारी यांनी यात्रा ठिकाणी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. हे समजताच त्याठिकाणी हजर झालेल्या लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यां विरोधी गटाच्या पुढं उभ्या राहून मोदी सरकारचा जयघोष करू लागल्या. दोन्ही कडून सुरू असलेल्या या जोरदार घोषणाबाजी मुळे त्याठिकाणी सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली, त्यामुळे एरवी शहराच्या आणि नागरिकांच्या हितासाठी आम्ही एकत्र आलो असे सांगत ५ वर्षे एकत्र सत्ता भोगलेले आता निवडणुकीचा काळ जवळ आल्याने एकमेकांच्या विरोधात समोर ठाकले आहेत हे लोणावळेकर जनता विसरणार नाही.त्यामुळे या दोघाच्या गोंधळामुळे नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा पासून मात्र त्यांना वंचित राहावे लागले.पाच वर्षे शहराच्या विकासासाठी एकत्र आलेले आता जनतेला सुविधा मिळवून देण्यासाठी का एकत्र नाही आले असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. सध्याची राजकीय परिस्थिती एवढी विचित्र निर्माण झाली आहे की कोणत्या पक्षाचा आमदार कोणत्या पक्षात जाईल एवढे सुद्धा त्यालाच सांगता येत नाही अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. सामान्य नागरिकांना सुविधा मिळणे हा उद्देश महत्वाचा केंद्रस्थानी मानून राजकारण हा वेगळा भाग असू शकतो. काही राष्ट्रवादी काही शिवसेना महाराष्ट्रात सत्तेत आहे. भारत सरकार ऐवजी मोदी सरकार अस लिहलेला रथ एका ग्रामीण भागातील युवकांने अडवला होता हा विडिओ सोशल मीडिया वर प्रचंड व्हायरल झाला होता या रथावर सामान्य माणसाचा दररोज हजारो रुपये खर्च कशासाठी? आणि ५०० रुपयाला मिळणारा गॅस १००० रुपयाला मिळतोय आहे तर उज्वला योजनेने असे काय कौतुक केले पाहिजे, आणि मोदी सरकारची कसली गॅरंटी?ज्यामुळे सामान्य माणसाला आनंद होइल.असे अनेक प्रश्न उपस्थित करत त्या युवकाने त्या ठिकाणी रथ घेऊन आलेल्या अधिकारीला धारेवर धरले होते.एवढे असताना मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घ्यायला होती.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page