फेरीवाल्यांचा १५ जुलैला आझाद मैदानावर पथ विक्रेता संघटना व संस्थेचे आंदोलन

मावळ मराठा न्युज नेटवर्क- देशातील पथ विक्रेत्यांनसाठी भारत सरकारने सन २०१४ रोजी पथ विक्रेता (उपजिवीका रक्षण व संसाधनांचे संरक्षण विनियमन ) अधिनियम २०१४ लागू होऊन ११वर्ष झाली आहेत. मात्र त्यांची अंमलबजावणी होत नाही.केंद्र सरकारने फेरीवाला व्यवसायासाठी पी एम स्वनिधी व इतर अनेक योजना आणल्या कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे . मात्र, पुणे , मुंबई , छत्रपती संभाजी नगर, धुळे सांगली अमरावती कोल्हापूर नंदुरबार बारामती दौंड जेजुरी सासवड भोर खोपोली लोणावळा अहिल्यानगर , सोलापूर, बुलढाणा, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, यवतमाळ, सह इतर शहरांमध्ये महापालिका नगरपालिका आणि पोलिस प्रशासन या व्यावसायिकांबाबत अन्यायकारक भूमिका घेत आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून , पुणे , मुंबई , छत्रपती संभाजी नगर, धुळे सांगली अमरावती कोल्हापूर नंदुरबार बारामती दौंड जेजुरी सासवड भोर खोपोली लोणावळा अहिल्यानगर , सोलापूर, बुलढाणा, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, यवतमाळ,शहरातील विविध भागात अधिकृतपणे वर्षानुवर्षे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना उठवण्यात येत आहे. या विरोधात आता हातगाडी फेरी पथारी स्टॉलधारक १५ जुलै रोजी आझाद मैदानावर आंदोलन करणार आहे. असा इशारा राज्यातील विविध संघटना, संस्था व फेरीवाला संघटनांनी आणि हाॅकर्स जाॅइंट एक्शन कमिटी महाराष्ट्र राज्याच्या नेतृत्वाखाली संजय शंके कार्यवाह जाणीव संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली मा श्री लक्ष्मण माने सचिव हाॅकर्स जाॅइंट एक्शन कमिटी महाराष्ट्र राज्य व मा श्वेता ओतारी अध्यक्षा जाणीव महिला संघटना यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख हे नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार आहे गेली ३० ते ४५ वर्षे पासून हजारो हातगाडी पथारी स्टॉलधारक फेरीवाले महानगरपालिका व नगरपालिका रस्त्यांवर पदपथावर व्यवसाय करीत आहेत. एका बाजूला शासन स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या योजना आखत आहे, तर दुसऱ्या बाजूला फेरीवाल्यांना उद‌वस्त करण्याचे काम महानगरपालिका , नगरपालिका व पोलीस करत असल्याचा आरोप फेरीवाल्यांकडून होत आहे.फेरीवाल्यांना न्याय द्यावा. महापालिकेने योग्य सर्व्हे करावा, योग्य ते शुल्क आकारून शासकीय महसूल वाढवावा. मात्र, फेरीवाल्यांना शिक्षा करणे, वाटेल तसा माल उचलणे, दंड लावणे, अशी अन्याय्य करवाई करू नये, हाॅकर्स जाॅइंट एक्शन कमिटी महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या मागण्या आहेतत्याचबरोबर १५ जुलै रोजी छत्रपती शिवाजी पार्क मैदान,येथे एक दिवशी आंदोलन करण्यात येणार आहे, असे हाॅकर्स जाॅइंट एक्शन कमिटी महाराष्ट्र राज्य तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. या आंदोलनात जाणीव हातगाडी फेरी पथारी स्टॉलधारक संघटना व दिलासा जन विकास संस्थेने पाठिंबा दिला आहे. मा श्री मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात येणार आहे. निवेदनात सविस्तर मागण्या सादर करण्यात येणार आहे आमच्या मागण्या १) महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिका व नगरपालिका स्तरावरील अतिक्रमण निर्मूलन विभागाची कारवाई तातडीने थांबविणे व जप्त साहित्य विनाशुल्क परत करावे २) केंद्र सरकारचा पथ विक्रेता ( उपजिवीका रक्षण व संसाधनांचे संरक्षण विनियमन) अधिनियम २०१४ राज्यात तातडीने लागू करणे.३) केंद्र सरकारचा पथ विक्रेता ( उपजिवीका रक्षण व संसाधनांचे संरक्षण विनियमन) अधिनियम २०१४ नुसार केंद्र सरकारचा पथ विक्रेता ( उपजिवीका रक्षण व संसाधनांचे संरक्षण विनियमन) योजना २०२५ आम्ही सादर केली आहे. ती राज्यात तातडीने लागू करणे.४) केंद्र सरकारचा पथ विक्रेता ( उपजिवीका रक्षण व संसाधनांचे संरक्षण विनियमन) अधिनियम २०१४ नुसार जी योजना लागू करण्यात येईल. त्या नुसार पुढील १) पथ विक्रेता बायोमेट्रिक पद्धतीने सर्वेक्षण करणे २) पथ विक्रेत्यांना नव्याने प्रमाणपत्र वितरण करणे ३) नाममात्र शुल्क नव्याने आकारणी करणे ४) नव्याने पथ विक्रेता क्षेत्र निर्माण करणे ५) पथ विक्रेता व त्यांच्या संसाधनांचे रक्षण करणे ६) मान्य पथ विक्रेता ‌क्षेत्रात पुढील सुविधा उपलब्ध करून देणे ७) स्वच्छ पाणी पुरवठा ८) ड्रेनेज लाईन टाकणे९) स्री व पुरुष स्वच्छतागृह १०) ऊन वारा पाऊस यांपासून संरक्षण करण्यासाठी छत ११) लाईट व्यवस्था १२) सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत १३) पथ विक्रेता समिती कार्यालय निर्माण करणे १४) पथ विक्रेता तक्रार समिती स्थापन करणे १५) शहरातील वाढत्या उष्णतेमुळे पथ विक्रेत्यांच्यावर होणाऱ्या परिणामांची नोंद घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात उष्माघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन सुविधा उपलब्ध करणेकळावे आपला संजय शंकेअध्यक्ष हाॅकर्स जाॅइंट एक्शन कमिटी महाराष्ट्र राज्य कार्यवाह जाणीव संघटना पुणे माजी सदस्य पथ विक्रेता समिती पुणे महानगरपालिका9422029808/9850529808

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page