आद्य क्रांतीवीर वस्ताद लहूजी साळवे,वासुदेव बळवंत फडके यांची पुण्यतिथी सकल मातंग समाज व शिवशाही व्यापारी संघाच्या वतीने उत्साहात साजरी



मावळ मराठा न्युज -पिंपरी,प्रतिनीधी, हजारो क्रांतिवीराचे गुरू जगेन तर देशासाठी मरेन तर देशासाठी असा संकल्प करणारे क्रांती ग्रुप वीर वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने आदय क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे व वासुदेव बळवंत फडके यांच्या अर्धाकृती स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रशासकीय इमारतीच्या प्रणागणामध्ये उपायुक्त चंद्रकांत इंदलकर साहेब व उपायुक्त अण्णासाहेब बोदडे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जनसंपर्क मुख्य अधिकारी किरण गायकवाड प्रफुल पुराणिक ,मा नगरसेवक मारुती भापकर, संदीपान झोंबाडे,सकल मातंग समाज प्रदेश समन्वयक लोकसेवक युवराज दाखले , आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्व अध्यक्ष बाबु पाटोळे,ज्येष्ठ नेते नानासाहेब कांबळे ,मंगेशजी डाखोरे ,गणेश कलवले, शिवाजीराव खडसे ,स्वप्निल अण्णा कांबळे, ऋषिकेश वाघमारे, अण्णासाहेब कसबे मोहन भिसे, अविनाश शिंदे,राजु आवळे, शंकर खवळे,आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.




