भुगावच्या येथील लवासाजवळ असणारे मारणेवाडी राममंदिर अक्षता कलश यात्रा झाली श्रीराममय

मावळ मराठा न्युज:- मारणेवाडी, भुगावच्या पुढे लवासा जवळ असणारे मारणेवाडी येथे राममंदिर अक्षता कलश यात्रा झाली पूर्ण गाव या सोहळ्यास उपस्थित होते. सर्वत्र रांगोळ्या काढून सर्व रामभक्तांचे स्वागत झाले गावातून मिरवणूकीने कलशाचे स्वागत आणि वाजत गाजत भजन म्हणत हा कलश विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आला. श्री राधेशामजी जगताप (काका ) , हभप शंकर (आबा) दगडे,भरत वांजळे ,हभप ज्ञानेश्वर रोकडे , श्री व सौ दिलीप भाऊ लगड , श्री दयारामजी जोशी ,रविजी कल्याणे , श्री सचिन चव्हाण , सौ मिनाताई देशमुख , प्रकाश गोरे , डॉ शितलकुमार गाधी , असे अडतीस जण या सोहळ्याला नांदेड सिटीतून उपस्थित होते. या गावातील हभप सर्वश्री : विजय दादा महाराज जगताप , नामदेवराव महाराज मारणे , अनिकेत महाराज मारणे , विशाल महाराज मारणे , शंकरराव महाराज मारणे , विजय सखाराम मारणे , रोहिदास किसन मारणे , बापू अमृता मारणे आणि भिका नाना मारणे या वारकरी हभप यांनी कलशाच्या मिरवणूकीत सहभाग घेतला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कलश संयोजकांचा गावाच्या वतीने सन्मान करण्यात आला , भोजन प्रसाद होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page