अक्षय तृतीया निमित्त सूर साधना आयोजित कलाकारांनी धकधक गर्ल माधुरी दीक्षित यांच्या चित्रपटातील सुमधुर गीते सादर




मावळ मराठा न्यूज -लोणावळा,सूर साधना गायन क्लासेस च्या वतीने नेहमीच वेगळी संकल्पना घेऊन गायनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात अक्षय तृतीयचे ओचित्य साधत लोणावल्यातील महिला मंडळ हॉल येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे खास प्रेक्षकांसाठी रंगमंच्यावर जिने प्रेक्षकांच्या मनावर निर्विवाद राज्य केले अशा धक धक गर्ल माधुरी दीक्षित यांचा कटाऊट पोस्टर लावण्यात आला होता दिप्रज्वलन व गणेशवंदनेने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली माधुरी दीक्षित यांची गाजलेली अनेक गिते सूर साधनाच्या कलाकारांनी सादर केली यामध्ये ज्येष्ठ गायिका मंगला राणे, दीपाली कांबळे, किरण कुलकर्णी, रमा सिनकर, सोनिया खोब्रागडे, मोनाली कुलकर्णी, संध्या होजगे, मोनिका मंडोल तसेच साथीला सुनील कडू, सुनील पानंगावकर, सिद्धान्त कांबळे,व सूर साधनाचे संचालक प्रदीप वाडेकर होते.कार्यक्रमाला राष्ट्रवादी शरद पवार लोणावळा शहर अध्यक्ष नासीर शेख, आधार फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश पाठारे, शिवसेना लोणावळा शहर अध्यक्ष संजय भोईर, महिला आघाडी अध्यक्षा मनीषा भांगरे, उपाध्यक्ष विशाल पाठारे, ज्येष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष पांडुरंग तिखे, लायन्स क्लब लिजेण्ड चे अध्यक्ष गोरख चौधरी, राजेश मेहता, बापूलाल तारे, ज्येष्ठ पत्रकार सि बी जोशी,बुलंद मावळचे गणेश गवळी,बापू कुलकर्णी, बाळासाहेब लोहारे, आदिसह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्तिथ होत्या




