लायन्स क्लब तळेगाव आणि के बी हायस्कूल यांच्यावतीने सुजाण पालकत्व यावर व्याख्यान





मावळ मराठा न्युज :- तळेगाव,लायन्स क्लब तळेगाव आणि के बी हायस्कूल या उभय संस्थांनी आयोजित केलेल्या सुजाण पालकत्व”-या विषयावर ला. डॉ. शालिग्राम भंडारी यानी पालकांशी संवाद साधला! आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षिका इतकीच पालकांची सुद्धा महत्त्वाची भूमिका असते- असे डॉक्टरांनी विविध दृष्टांत काव्यपंक्ती आणि शेरोशायरी सादर करून नमूद केले.या कार्यशाळेचे लायन अनिल तानकर अध्यक्ष होते तर प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष लायन संदीप काकडे ,खजिनदार सौ गौरी काकडे आणि विशेष अतिथी लायन दीपक बाळसराफ उपस्थित होते. मुख्याध्यापिका सौ ज्योती सावंत आणि त्यांचा संपूर्ण स्टाफ यांनी कार्यक्रमात परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.सक्रिय म्हणूनच पालकांचा या कार्य शाळेस शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.पालकांनी दिलेल्या उस्फूर्त प्रतिसाद त्यांच्या प्रतिक्रियेतून व्यक्त झाला.