लोणावळ्यात बापूलाल तारे यांचा माझी कविता माझे गाणे या स्वरसंगम कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद



मावळ मराठा न्यूज :-लोणावळा,येथील बापूलाल तारे यांच्या माझी कविता माझे गाणे या स्वरसंगम स्वामी समर्थ यांचेवर स्वरचित गाण्यांना स्वतः चाली लावलेल्या कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांचा या आगळ्या वेगळया प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळाला. नुकताच ऍड बापूसाहेब भोंडे हायस्कुलच्या प्रांगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यात हार्मोनियम चंद्रकांत जोशी,तबलाची साथ मनोज कदम,की बोर्ड वर गिरीश बापट,ऑक्टोपॅड वर सुनिल बोके,तबला ढोलकी विजय वाघचौरे,संयोजक बापूलाल तारे यांना सहगायक अनिल मांडवडे,मीनाक्षी गायकवाड, किरण कुलकर्णी, अभिषेक तारे यांनी साथ दिली तर सूत्रसंचालन पूजा चचडा यांनी केले. बापूलाल तारे यांचे वडिल शाहीर स्वर्गीय सखाराम तारे यांनी स्वातंत्र्य पूर्व काळात मावळ तालुक्याची ओळख सांगणारी रचना लोणावळेकरांना भावली.स्वरचित ५० हुन अधिक कविताना चाल लावून सदर कार्यक्रम सादर केल्याने कार्यक्रमातील प्रत्येक गीताला नागरिकांनी भरभरून साथ दिली.सदर कार्यक्रमात मावळ वार्ता फॉउंडेशनच्या वतीने बापूलाल तारे आणि त्यांचा सर्वं सहकारी यांचा सन्मान करण्यात आला.सदर कार्यक्रमासाठी मावळचे आमदार सुनिल शेळके,ऍड माधवराव भोंडे,नंदकुमार वाळुंज,राजेंद्र चोहान,माजी नगरसेवक राजू बचे,अनिल गायकवाड,संजय ढाकोळ,रजनीकांत यंदे यांचे मोठे सहकार्य लाभले.उपस्थित मान्यवर यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.




