राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचा आंबवणे येथे समारोप



मावळ मराठा न्युज,लोणावळा:- एज्युकेशन ट्रस्ट चे कला, वाणिज्य व विज्ञान महाविध्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे ७ दिवशीय शिबीर दिनांक १७ जानेवारी ते २३ जानेवारी २०२४ या कालखंडात मौजे. आंबवणे येथे संपन्न झाले. या कालावधीत स्वयंसेवकासाठी व्याख्यान मालेतही बौध्दीक सत्र संपन्न झाले. स्वयंसेवकांच्या व्याख्यान मालेत प्रथम प्रा. संदिप लबडे यांचे ‘भारतीय संस्कृती आणि विज्ञान, तर प्रा. भूषण गोंदके नैसर्गिक संसाधने जतन’, डॉ. प्रा. मल्हारी नागतिलक – भुरशी नाशकांचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम, “प्रा. प्रतीक्षा उईके – मानसिक आरोग्य, प्रा. दिपक कदम कौशल्य आधारीत शिक्षण, प्रा. ॲड. रविंद्र यादव- छत्रपती शिवाजी महारांचा विज्ञान दृष्टीकोन, प्रा. संजय साळुंके भारतीय संविधानाची ओळख, इत्यादी महत्वपूर्ण व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले होते.त्याच प्रमाणे, शिबीर कालाधित गावात विशेष उपक्रम राबविण्यान आले. त्यात गावातील प्रत्येक कुटुंबातील शाळाबाहय मुले व शाळा अर्धवट सोडलेली मुले व स्त्री-पुरुष यांचा सर्वे करण्यात आला, तसेच स्वच्छता मोहिम राबविण्यात आल्या. विद्यालयाच्या परिसरातही स्वच्छता करण्यात आली. तसेच ‘कोराईगड’ या गडाच्या पायथ्यापासून ते गडमाथ्या पर्यंत स्वयंसेवकांनी गडावर जाणाऱ्या अवघड ठिकाणचा पायऱ्या बनविणे, प्लास्टिक निर्मुलन ही करण्यात आले. तसेच रात्रीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात, स्वयंसेवक व गांवकऱ्यान साठी मनोरंजन पथनाट्य, स्वयंसेवकांनी सादर केली. व्यसनमुक्ती, पर्यावरण वाचवा, पाणी आडवा, पाणी जिरवा, अवयवदान दान एक वरदान, लेक वाचवा लेक शिकवा, स्त्रीभ्रूण हत्या, इ. कार्यक्रम, शिवराज्याभिषेक व त्या वरील पोवाडे हे सादर करण्यात आले. त्या मध्ये प्रसिद्ध भारुडकार प्रबोधनकार, प्रा. अनिल केंगर यांचा ही प्रसिद्ध एकनाथी भारुडाचा कार्यक्रम झाला. यावेळी गांवकरी स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्याच प्रमाणे राष्ट्रीय सेना योजनेचा समारोप प्रसंगी लो. ए. ट्रस्ट चे विश्वस्त, श्री. नंदकुमार वाळंज तर प्रमुख पाहुणे विश्वस्त मा.श्री. सुनिल ठोंबरे सर महाविद्यालयाने प्र. प्राचार्य डॉ.श्री. विलास पाटील, गावचे पोलिस पाटील- मा.श्री. गणेश दळवी, डॉ. राजेद्र देवरे, विद्यालयाचे मुख्याध्यपक मा.श्री. भटू देवर सर, गावातील सामाजिक कार्यकर्ते, शिक्षकवृंद, स्वयंसेवक, मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन, कार्यक्रम अधिकारी- प्रा. धनराज पाटील, प्रा भुषण गोंदके, प्रा. अमोल नवगिरे यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. पवन शिंगारे सर तर सूत्रसंचालन कु.तेजल केदार, व कार्यक्रमाचे आभार कु. स्नेहा खणेकर यांनी केले.




