“वारसा स्वच्छतेचा,मावळा शिवरायांचा”अंतर्गत स्वच्छता मोहीम उद्या भुशी डैम परिसर,सत्य कार्तिक यांचे आवाहन

मावळ मराठा न्यूज,लोणावळा,पुणे ग्रामीण,जिल्हा पोलिस,लोणावळा उपविभाग आयोजित “वारसा स्वच्छतेचा,मावळा शिवरायांचा” अंतर्गत स्वच्छता मोहीम पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक अंकित गोयल,पुणे ग्रामीण चे अप्पर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्राची कुलदेवी असलेल्या वेहेरगाव येथील आई एकवीरा देवी मंदिर आणि बौद्धकालीन लेणी परिसर स्वच्छ करण्यात आला त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या लोहगड किल्ला आणि परिसर येथे स्वच्छ्ता मोहीमेला पोलीस अधिकारी ,कर्मचारी, नागरिक, वकील, सामाजिक संस्था,शिवदुर्ग मित्र,लोणावळा शहर पत्रकार संघ यांनी आणि गड कोट किल्ले प्रेमी यांनी भरभरून प्रतिसाद देत तेथील कित्येक टन कचरा संकलित करून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. दिनाक १० मे लायन्स पॉइंट, येथील धार्मिक स्थळ शिवलिंग पॉइंट येथे स्वच्छता मोहीम राबविन्यात आली. असल्याचे लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी आय पी एस सत्य साई उद्या दिनाक १७ मे रोजी बुधवार रोजी सकाळी ६ .३० वाजता पर्यटकांचे आकर्षण असलेला भुशी डैम आणि परिसरात स्वच्छ्ता मोहीम राबवली जाणार आहे यावेळी सायबर सुरक्षा यावर पथ नाट्य सादर करून जनजागृती केली जाणार आहे.तरी जास्तीत जास्त लोणावळा शहर आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजर राहून आपला परिसर ,आपले लोणावळा आपली पर्यटन स्थळे, गड कोट किल्ले ,मंदिरे स्वच्छ ठेवण्यासाठी “वारसा स्वच्छतेचा,मावळा शिवरायांचा” या स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवावा असे आवाहन लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी केले आहे.अवैध व बेकायदेशीर धंदयांची साफ सफाई सोबतच सामाजिक बांधिलकी आणि जनसंपर्क वाढवणारा कर्तव्य दक्ष अधिकारी आय पी एस सत्य साई कार्तिक यांनी नागरिकांसोबत पोलिसांचे चांगले संबंध प्रस्थापित व्हावेत, नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वासाचे नाते निर्माण व्हावे यासाठी महाराष्ट्राची आराध्य कुलस्वामिनी श्री एकवीरा आई मंदिर परिसर येथे स्वच्छ्ता मोहीम राबविनार आहे. त्यानंतर गड किल्ले पर्यटन स्थळ येथे देखील स्वछता मोहीम ते राबविणार आहेत.त्यात ते महाविद्यालयीन विद्यार्थ्याना वाहतूक नियम,व इतर जन जागृती करणार आहेत. तसेच यात पोलिसांसह सामाजिक संस्था,वकील,पत्रकार,समाजातील सर्व घटकातील नागरिकांनी सहभाग नोंदवावा असा त्यांचा मानस आहे. जून महिन्यात जन जागृती प्रभात फेरी काढण्याचा मानस त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी आयपीएस श्री सत्यसाई कार्तिक यांच्या संकल्पनेतुन श्री एकविरा देवस्थान परिसरातील स्वच्छता मोहीम बुधवार दिनांक २६/४/२०२३ रोजी सकाळी ६.३० वाजता आयोजीत केली आहे. यांच्या प्रमुख उपस्थितीत सहभागाबद्दल प्रशस्ती पत्र देण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या स्वच्छ्ता मोहिमेत भाग घ्यावा असे आवाहन सत्यसाई कार्तिक यांनी केले आहे.




