पुणे जिल्ह्यातील २५० शाळांमध्ये गुरुकुल शाळेला पंचतारांकित हरित शाळा पुरस्कार

मावळ मराठा न्युज:- लोणावळा,पुणे जिल्ह्यातील २५० शाळांमध्ये विद्या विनय सभा गुरुकुल शाळेला महाराष्ट्र शासन , वन विभाग,सामाजिक वनीकरण विभाग पुणे , राष्ट्रीय हरित सेना ‘ पंचतारांकित हरित शाळा ‘ पुरस्कार २०२३-२०२४ प्रथम क्रमांकाचा जिल्हा पुरस्कार मिळाला असून सौ. सुनिता सिंग प्रधान, मुख्य वनसंरक्षक सामाजिक वनीकरण , महाराष्ट्र राज्य ,अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री. विवेक खांडेकर, श्री. विजय भिसे वनसंरक्षक पुणे ,मा.सौ.आशा भोंग विभागिय वनअधिकारी सामाजिक वनीकरण विभाग पुणे मा. श्री. प्रजोत पालवे साहाय्यक वनसंरक्षक पुणे यांच्या हस्ते आज ७५ व्या प्रजासत्ताक दिनी सकाळी ७ .३० मिनिटांनी प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार स्विकारण्यासाठी विद्यालयातील पर्यावरण शिक्षक श्री.रंगनाथ वरे, श्री .रमेश बोन्द्रे, श्री राजाराम चावडे व विद्यार्थी कु. पल्लवी गरुड ८ अ व प्रतीक वरे ८ अ उपस्थित होते.संस्थेचे अध्यक्ष श्री. दिनेश राणावत, उपाध्यक्ष श्री. दीपक गंगोळी , मानद सचिव सुरेश पंसारी व कोषाध्यक्ष श्री. प्रदीप कैंया ,विश्वस्त श्री. बापुलाल तारे व शाळेचे मुख्याध्यापक श्री. संतोष पळसकर यांनी सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. शाळेत प्लँट लायब्ररी , २५० प्रकारची झाडे , दुर्मिळ झाडे , ड्रेन वॉटर ची उत्कृष्ट सुविधा , कचरा व्यवस्थापन , इको ब्रिकस व प्लास्टिक बाटल्या च्या कलाकृती , पर्यावरण जनजागृती कार्यक्रम यामुळे हा पुरस्कार मिळाला आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page