लोणावळा नगरपरिषद शाळाना उद्या दिनांक २० ऑगस्ट रोजी अतिवृष्टी मुळे सुट्टी जाहीर





मावळ मराठा न्यूज – लोणावळा,लोणावळामध्ये सलग आठवडा भर मुसळधार पाऊस होत आहे त्याबद्दल लोणावळा नगरपरिषदेच्या सर्व शाळा यांना सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.त्यांनतर पाऊसाचे हवामान आणि परिस्थिती बघून शिक्षण विभागाचे श्री पानसरे तसा निर्णय घेतील असं लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री अशोक साबळे यांनी मावळ मराठा न्युज शी बोलतांना सांगितले. लोणावळ्यात सततधार पाऊस सुरु असल्याने लोणावळा नगरपरिषदेचे माजी उपगराध्यक्ष श्रीधर पुजारी, माजी शिक्षण मंडळ सभापती जितेंद्रभाई टेलर यांनी शाळेतील विद्यार्थ्याचा सुरक्षे आणि हितासाठी प्रशासना कडे विनंती केली होती.ती प्रशासनाने मान्य केली असून उद्या दिनांक २० ऑगस्ट २०२५ बुधवार रोजी लोणावळा नगरपरिषद शाळांना सुट्टी जाहिर केली असून पुढील सुट्ट्या पावसाच्या अंदाज घेऊन जाहिर केल्या जातील अशी माहिती मुख्याधिकारी श्री साबळे यांनी दिली.



