निधन वार्ता:- गोपाळ दगडू परदेशी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन

मावळ मराठा न्युज:-तळेगाव दाभाडे नगरपरिषदचे माजी नगरसेवक, आवाज न्युज चे संपादक, दुर्गामाता मंदिर,चे विश्वस्त अध्यक्ष गोपाल दगडू परदेशी, वय वर्षे ५४,यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे. त्यांची अंत्ययात्रा आज रविवार, दिनांक २८/०१/२४ रोजी सकाळी दहा वाजता राहत्या घरापासून निघेल.अंत्यविधी बणेश्वर स्मशानभूमी, तळेगाव दाभाडे येथे करण्यात येणार आहेत.तळेगाव दाभाडे येथील गोपाल दगडू परदेशी हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते.नेहमीच हसतमुख आणि सदैव समाजातील विविध उपक्रमात आवर्जून सहभागी होणारे हे व्यक्तिमत्त्व होते.हे दुःख पचविण्याची शक्ती परमेश्वर त्यांच्या कुटुंबीयांना देवो आणि मृतात्म्यास सदगती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. साप्ताहिक मावळ नागरिक,एम एन न्युज आणि मावळ मराठा न्युज परिवार यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page