कुठलेही कार्य निष्काम,फळाची अपेक्षा न करतां करा,संकटात एक अदृश्य शक्ती आपल्या पाठीशी उभी राहील – डॉ.भंडारी


मावळ मराठा न्युज :-तळेगाव,समर्थ विद्यालयाचे पालक महेश भाई शहा आणि मुख्याध्यापिका काळोखे यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली ७५ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात संपन्न झाला. टाटा कंपनीच्या उच्च पदावर विराजमान असलेले शाळेचे माजी विद्यार्थी श्री योगेश लिमये यांच्या शुभहस्ते प्रमुख पाहुणे ज्येष्ठ लेखक,वक्ते डॉ. शालिग्राम भंडारी, संस्थेचे संचालक ला. महेशभाई शहा,लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष दीपक बाळसराफ,मुंबईचे शिक्षण तज्ञ श्री महादेव ढोकळे,मुख्याध्यापिका वासंती काळोखे, यांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात झेंडावंदन समारंभ साजरा झाला.त्यानंतर विद्यार्थीनी योगिता थडके हिने आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून प्रणित वाघमोडे या विद्यार्थ्याने गाण्यातून सहकारी सौ प्रभा काळे यांनी बसवलेल्या उत्कृष्ट सांघिक नृत्यातून राष्ट्रप्रेमाच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. श्री महादेव ढोकळे वाचन संस्कृती विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. शाळेचे माजी विद्यार्थी असलेले उच्च विद्या विभूषित योगेश लिमये यांनी आपला शैक्षणिक क्षेत्रातील यशस्वी प्रवास सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे डॉ. भंडारी यांनी कुठलेही कार्य करीत असताना निष्काम म्हणजेच कुठल्याही फळाची अपेक्षा न करतां जर आपण कार्य केले तर कोणत्याही संकटात एक अदृश्य शक्ती आपल्या पाठीशी आपल्या संरक्षणासाठी उभी राहते याचा स्वतःचा अनुभव त्यांनी कथन करून शेरोशायरीतून विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. ला. दीपक बाळसराफ यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात. मुख्याध्यापिका वासंती काळोखे यांनी सर्वांचे आभार मानले. सौ प्रभा काळे यांनी सूत्रसंचालन या केले. शिक्षक वृंद पालक, आजी,माजी विद्यार्थी या सर्वांच्या उपस्थितीत झेंडावंदन समारंभ पार पडला त्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.




