अक्षय साबळे यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मावळ उपतालुका युवा सेना पदी निवड


मावळ मराठा न्यूज़ ,लोणावळा:- सध्या राज्यात गलिच्छ आणि किळसवानी राजकरण सुरु असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात इतके वर्षे सत्ता, पैसा, पद मिळून देखील पक्षाशी फार कत घेतलेल्या पदांवर निष्ठावंत कार्यकर्त्यांची चांगली तरुण फ ळी निर्माण होत आहे . राज्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात होतकरू, प्रामाणिक, तरुण यांचा कल मात्र मराठी अस्मिता आणि पक्षाचे काम करण्यासाठी वाढताना दिसतो आहे.त्याचाच एक भाग म्हणून पुणे जिल्ह्यात पदाधिकारी यांच्या नियुक्त्या उ बा ठा मध्यवर्ती कार्यालयातून केल्या आहेत यात लोणावळ्यातील तरुण तडफदार कार्यकर्त्ता अक्षय मारुती साबळे यांची नुकतीच युवा सेनेच्या उप तालुका प्रमुख पदी ( नाणे मावळ) निवड करण्यात आली आहे. युवकांत जावून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य पोहचवून पक्ष वाढी साठी पुढील काळात प्रयत्न करणार असल्याचे अक्षय साबळे यांनी मावळ मराठा न्यूज़ शी बोलताना सांगितले.पुढील वाटचालीसाठी त्यांचेवर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.




