रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया लोणावळा शहर,”सम्यक क्रांती फाऊंडेशन यांच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन



मावळ मराठा न्यूज,लोणावळा ” लोणावळ्यात भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन!” रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया लोणावळा शहर “सम्यक क्रांती फाऊंडेशन,लोणावळा आयोजित व ना. रामदासजी आठवले,केंद्रीय सामाजिक न्याय,राज्यमंत्री.भारत सरकार यांच्या वाढ दिवसानिमित्त भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन कमलशिल म्हस्के (लोणावळा शहर ,R.P. I .शहराध्यक्ष) यांनी केले. या क्रिकेट स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक.१,००००० व चषक.,द्वितीय क्रमांक,५०,००० व चषक. तृतीय क्रमांक,३०,००० व चषक. चतुर्थ क्रमांक २५,००० व चषक .आणि इतर बक्षिसे. आहेत..या स्पर्धेचे उद्घाटन श्री.सूर्यकांत वाघमारे (अध्यक्ष.पश्चिम महाराष्ट्र R .P .I .) यांच्या हस्ते करण्यात आले .प्रसंगी आयोजक कमलशिल आनंद म्हस्के ,गणेश गायकवाड ,दिलीप दामोदरे, लक्ष्मण भालेराव, अशोक सरावते, बनसोडे,रोहिणी देसाई,सीमाताई देसाई,आनंद म्हस्के,मोहन जगताप, इ.तसेच आ र.पी.आय.तालुका व शहरातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेसाठी अंपायर म्हणून अमर साठे,सलमान शेख,हे काम पाहत आहेत.समालोचन श्री.सुमित सोनवणे करीत आहेत व यू ट्यूब चे कौस्तुभ पाटील(ड्रीम क्रिकेट) सह-संयोजक अनिकेत सायलेकर व सी.सी.एल.परिवार.या स्पर्धेसाठी पुणे,पिंपरी,चिंचवड,इंदापूर,मुंबई,अलिबाग.येथून संघ टीम आले असल्याची माहिती आयोजक कमलशिल आनंद म्हस्के यांनी मावळ मराठा न्यूज प्रतिनिधीस दिली




