वाय. सी. क्लासेसच्या वतीने १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबीर


मावळ मराठा न्युज:- लोणावळा,वाय. सी. क्लासेसच्या वतीने, इ. १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या दृष्टीने ‘Career counselling for Global Opportunities’ या सत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्रामधे समुपदेशन करण्यासाठी CTIF Global capsule, India Division चे संचालक तसेच ‘विश्वनिकेतन इन्स्टिट्यूट ऑफ मैनेजमेंट एंड इंजिनियरिंग टेक्नोलॉजी’ चे विश्वस्त व उपाध्यक्ष ‘डॉ. संदीप इनामदार’ व विश्वस्त प्रो. अनिल पवार उपस्थित होते.बारावी म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा. या निर्णायक वळणावर करिअरच्या दृष्टीने योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक असते. प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांना अपेक्षेएवढे गुण मिळतातच असे नाही. कमी गुण मिळूनही करिअरच्या विविध वाटा कोणत्या, एखादे क्षेत्र कसे निवडावे, त्याबद्दलची माहिती कशी मिळवावी, पदवीचे शिक्षण कसे पूर्ण करावे, त्यासाठी महाविद्यालय कसे निवडावे आणि अमेरिका, युरोपमधील जर्मनी, डेन्मार्क येथे उच्च शिक्षणासाठी उपलब्ध असलेल्या शिष्यवृत्ती व संधी कशा मिळवायच्या, याचे संपूर्ण मार्गदर्शन या सत्राच्या माध्यमातून विद्यार्थी आणि पालकांना मिळाले.करिअरच्या ठरलेल्या वाटांसोबत ‘Project Based Learning’ वेगळ्या चाकोरी मोडणार्या या नवीन वाटेची ओळखही विद्यार्थ्यांना या सत्रात झाली. आपली आवड व क्षमता या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन करिअरची योग्य निवड कशी करावी? करिअरच्या अवघड टप्प्यांवर कोणत्या गोष्टींचा विचार करावा? या विषयांवर करिअर समुपदेशक डॉ. संदीप इनामदार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी व पालकांशी संवाद साधला.वाय. सी. क्लासचे संचालक श्री दुडे सर, सहकारी शिक्षक दिपेश गोणते सर, मयुर कनगुटकर सर व सौ. सुजाता आंबेकर मॅडम यांचं सहकार्य लाभले.




