विकासाचा नावाखाली लोणावळ्याची निसर्गरम्य वातावरण आणि शुद्ध हवा ही ओळख पुसू नये – नासिरभाई शेख






मावळ मराठा न्युज -लोणावळा, आमचा विकासाला विरोध नाही, मात्र विकास पर्यावरणपूरक असावा”स्कायवॉक प्रकल्पास आमचा कोणताही विरोध नाही. उलट लोणावळ्यासारख्या पर्यटननगरीसाठी वाहतूक व्यवस्था,पर्यटकांची सुरक्षितता आणि शहराचा विकास या दृष्टीने हा प्रकल्प निश्चितच उपयुक्त व स्वागतार्ह ठरू शकतो. मात्र विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होऊ नये, ही आमची भूमिका आहे. लोणावळ्याची खरी ओळख ही येथील डोंगररांगा, हिरवाई, झाडे आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे आहे. त्यामुळे विकासकामे करताना “विकास विरुद्ध पर्यावरण” असा संघर्ष निर्माण करण्याऐवजी “विकासासोबत पर्यावरणाचे संरक्षण” या भूमिकेतून प्रकल्पाची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. त्यामुळे केवळ रस्ता रुंदीकरणाच्या कामात झाडे अडथळा ठरत आहेत म्हणून ती तोडण्याचा पर्याय स्वीकारण्यापूर्वी PMRDA ने प्रकल्पाची रचना व रस्त्याची alignment पुन्हा तपासावी. आवश्यक असल्यास alignment मध्ये किरकोळ बदल करून, रस्त्याची रुंदी किंवा प्रकल्पाच्या डिझाइनमध्ये तांत्रिक बदल करून जास्तीत जास्त झाडे वाचविण्याचा प्रयत्न प्रथम करण्यात यावा.अशी मागणी लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष यांनी लोणावळा नगरिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्याकडे लेखी निवेदन देऊन केली आहे.एका बाजूला पर्यटनविकासासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून प्रकल्प उभारायचा आणि दुसऱ्या बाजूला त्याच प्रकल्पासाठी लोणावळ्याची हिरवाई नष्ट करायची, हे दीर्घकालीन दृष्टीने योग्य ठरणार नाही. म्हणून आमची मागणी प्रकल्पाची अंमलबजावणी पर्यावरणपूरक पद्धतीने करण्याची आहे. ” विकास हवा, पण निसर्गाच्या किंमतीवर नाही; लोणावळ्याचा विकासही झाला पाहिजे आणि लोणावळ्याची हिरवाई ही टिकली पाहिजे.वरील विषयास अनुसरून दि. ०१/०९/२०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली सार्वजनिक नोटीस माझ्या निदर्शनास आली आहे. सदर नोटीसीनुसार छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, रायवूड ते ट्रायोस मॉल, लोणावळा या रस्त्यालगतची एकूण ३३ झाडे, त्यापैकी २२ झाडांचे पुनर्रोपण व ११ झाडे तोडण्याचे प्रस्तावित करण्यात आले असून, त्याचे कारण म्हणून स्कायवॉक प्रकल्पाच्या रस्ता रुंदीकरणाच्या कामात अडथळा निर्माण होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सदर प्रस्तावास आम्ही खालील कारणांवरून ठाम हरकत नोंदवीत आहे.आमच्या हरकती व मागण्या१. झाडे तोडणे हा पहिला पर्याय का?सदर रस्ता हा पर्यटननगरी लोणावळ्यातील महत्त्वाच्या व निसर्गदृष्ट्या संवेदनशील परिसरातून जात आहे. त्यामुळे केवळ रस्ता रुंदीकरणाच्या कामात अडथळा येतो म्हणून मोठ्या संख्येने झाडे तोडणे योग्य नाही. झाडे वाचवून प्रकल्पाची रचना किंवा रस्त्याची alignment बदलण्याचा पर्याय प्रथम तपासण्यात आला आहे का, याचा अहवाल सार्वजनिक करण्यात यावा.२. PMRDA चा मंजूर आराखडा सादर करावा,सदर काम PMRDA मार्फत प्रस्तावित असल्यास, त्या प्रकल्पाचा मंजूर DPR, रस्ता रुंदीकरणाचा नकाशा, road alignment, आवश्यक रस्त्याची रुंदी आणि संबंधित तांत्रिक मंजुरी नगरपरिषदेस सादर करण्यात आली आहे का, याची माहिती द्यावी.३. प्रत्येक झाडाबाबत स्वतंत्र माहिती द्यावी.प्रस्तावित ३३ झाडांपैकी प्रत्येक झाडाचा प्रकार/प्रजाती, अंदाजे वय, खोडाचा घेर, झाडाची सद्यस्थिती झाड तोडण्याचे किंवा पुनर्रोपणाचे कारण याची स्वतंत्र नोंद/Tree Survey Report नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावी.४. ११ झाडे तोडणे अपरिहार्य असल्याचे तांत्रिक कारण दाखवावे.११ झाडे तोडणे अपरिहार्य असल्याचे कोणत्या तांत्रिक अहवालावरून ठरविण्यात आले आहे? संबंधित Tree Officer चा पाहणी अहवाल व PMRDA चा तांत्रिक अहवाल उपलब्ध करून द्यावा.१. पुनर्रोपणाबाबत स्पष्ट माहिती द्यावी.२२ झाडांचे पुनर्रोपण नेमके कोठे करण्यात येणार आहे, त्यासाठी जागा निश्चित केली आहे का, कोणत्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पुनर्रोपण होणार आहे आणि पुनर्रोपित झाडांच्या जिवंत राहण्याची जबाबदारी कोणाची असेल, हे स्पष्ट करावे. २०२१ च्या कायद्यातील दुरुस्तीनुसार पुनर्रोपण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करण्याची तसेच compensatory plantation आणि झाडांच्या survival ची खात्री करण्याची Tree Authority ची जबाबदारी आहे.६. पर्यायी तांत्रिक उपायांचा अभ्यास करावा.झाडे तोडण्याऐवजी रस्त्याची रुंदी, divider, फुटपाथ, अथवा alignment मध्ये आवश्यक ते बदल करून जास्तीत जास्त झाडे वाचवता येतील का, याचा स्वतंत्र तांत्रिक अभ्यास करण्यात यावा.वरील सर्व कागदपत्रे, तांत्रिक अहवाल, मंजूर आराखडा आणि पर्यायी उपायांचा अभ्यास नागरिकांसमोर येईपर्यंत सदर ११ झाडे तोडण्यास कोणतीही अंतिम परवानगी देऊ नये, तसेच प्रत्यक्ष झाडतोडीची कार्यवाही करू नये.अंतिम मागणीलोणावळ्याची ओळख ही केवळ पर्यटनस्थळ म्हणून नसून निसर्ग, डोंगर, झाडे व हिरवाई यामुळे आहे. विकासकामे आवश्यक असली तरी विकासाच्या नावाखाली अनावश्यक वृक्षतोड होऊ नये, ही नागरिकांची रास्त अपेक्षा आहे.त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान ते ट्रायोज मॉल या मार्गावरील प्रस्तावित वृक्षतोडीचा निर्णय तात्पुरता स्थगित ठेवून, PMRDA चा मंजूर आराखडा व तांत्रिक अहवाल तपासावा, झाडे वाचविण्यासाठी पर्यायी alignment चा अभ्यास करावा आणि त्यानंतरच कायद्यानुसार निर्णय घ्यावा, अशी माझी ठाम मागणी आहे.



