लोणावळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची आळंदी व देहू येथे तीर्थक्षेत्र भेट


मावळ मराठा न्युज:- लोणावळा,लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे डॉ. बी. एन.पुरंदरे कला, श्रीमती एस. जी. गुप्ता वाणिज्य आणि श्रीमती एस. ए. मिठाईवाला विज्ञान महाविद्यालय, लोणावळा येथील मराठी विभागाच्या वतीनेश्री क्षेत्र देहू व आळंदी या ठिकाणी गुरूवार दि. ८ फेब्रुवारी २०२४ रोजी मराठीच्या विद्यार्थ्यांसाठी क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते. या क्षेत्रभेटी प्रसंगी आळंदी येथील श्री शरदचंद्र पवार महाविद्यालयाचे प्राध्यापक, संतसाहित्याचे अभ्यासक व प्रसिद्ध कीर्तनकार डॉ. पांडुरंग मिसाळ यांनी वारकरी संप्रदाययातील आळंदीचे महत्त्व व संत ज्ञानेश्वर यांचे कार्य विद्यार्थ्यांना सांगितले. वारकरी संप्रदायातील संतांचे समाज जीवनातील योगदान, समाजाची सामजिक प्रगती करण्यासाठीच संतांनी आपले सर्व अयुष्य वेचले असल्याचेअस सांगितले. .महाभारतातील उदाहरणे देऊन सरांनी वारकरी संप्रदायाचे महत्त्व अधोेखित केले. तसेच आळंदीतील सुवर्ण पिंपळ, संत एकनाथ महाराजांचा पार, संजीवन समाधी, अजाण वृक्ष तसेच आळंदी येथील कीर्तन संस्था या ठिकाणांची अभ्यासपूर्ण माहिती आपल्या मार्गदर्शनातून मिसाळ सरांनी दिली. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय व हरिनाम सप्ताह यांंचे कार्य व महत्त्व समजावे यासाठी मुलांना घेऊन आळंदी येथे सुरू असलेल्या कीर्तन महोत्सवाला भेट दिल्या.श्रीक्षेत्र देहू येथे संत तुकाराम यांचे वैकुंठ प्रयाणाचे ठिकाण तसेचसंत तुकाराम महाराजांच्या घराला भेट दिली . देहू येथील संत साहित्याचे अभ्यासक श्री. विक्रम भोईटे यांनी देहू या तीर्थ क्षेत्राबद्ल व संत तुकाराम महाराजांचे कार्य आपल्या मार्गदर्शनतून सांगितले. गाथा मंदिर, तुकाराम मंदिर आणि टाळकरी मंदिर या ठिकाणाची माहिती भोईटे सरांनी विद्यार्थांना दिली. या क्षेत्रभेटीचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख सरांच्या मार्गदर्शनाखाली मराठी विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र देवरे, सहाय्यक प्राध्यापक संदीप खाडे, प्रा. सतोष शिंदे यांनी केले होते. तसेच मानसशास्त्र विभागातील प्रा. प्रतिक्षा उईके याही क्षेत्रभेटीसाठी पूर्णवेळ उपस्थित होत्या. या क्षेत्र भेटीसाठी प्रथम वर्ष कला, द्वितीय वर्ष कला आणि तृतीय वर्ष कला या वर्गांतील एकूण २७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.




