भरत अगरवाल नागरी सहकारी पतसंस्थेच्या भरत सहकार पैनल प्रचाराचा शुभारंभ


मावळ मराठा न्यूज,लोणावळा,भरत अगरवाल नागरी सहकारी पतसंस्थेच्या भरत सहकार पैनलचा प्रचाराचा नारळ भांगरवाडी येथील श्री गणपती मंदिर येथे नारळ वाढून आणि श्रीराम मंदिर येथे प्रचाराचा नारळ फोडण्यात आला, यावेळी भरत सहकार पैनलचे सर्व उमेदवार उपस्थित होते,भरत सहकार पैनलला बैट च्या चिन्हावर शिक्का मारून प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव आणि मिलिंद खळदकर यांनी केले. भरत अगरवाल नागरी सहकारी पतसंस्थेच्या येत्या ३० जानेवारी रोजी पंचवार्षिक संचालक निवडणूक होत आहे,यासाठी भरत सहकार पैनल प्रचाराचा नारळ यावेळी फोडण्यात आला.यावेळी ॲड बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे सर्वेसर्वा ॲड माधवराव भोंडे, माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव,बाळासाहेब जाधव, भगवान तनवाणी , पाटणकर,परदेशी,बिंद्रा गणात्रा,देविदास कडु,समीर इंगले, योगिता कोकरे,दिलीप लोंढे ,विजय सिनकर, कुलकर्णी,सूरेश जाधव, आणि भरत सहकार पैनलचे उमेदवार राजू बाबुराव दळवी,संजय खंडेराव गायकवाड,मिलिंद सुरेश खळदकर,रामविलास रामनाथ खंडेलवाल,अरविंद भगवान कुलकर्णी,यशवंत गंगाधर पायगुडे आणि महिला प्रतिनिधी म्हणून संस्थेच्या प्रदीर्घ काळ सर्वांना सोबत घेवून संस्थेची वाटचाल प्रगती पथावर नेणाऱ्या लता भरत अगरवाल,सुनंदा दत्तात्रय दाभने आणि अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग साठी सुरेश लक्ष्मण गायकवाड उपस्थित होते.




