*पिंपरी चिंचवडमध्ये पर्यावरण प्रेमींचा हरित संगम*







मावळ मराठा न्युज- पिंपरी, पर्यावरण संरक्षण ही एक केवळ वयैक्तिक कोणा एकट्याची जबाबदारी नसून आपणा सर्वांच्या अस्तित्वाची ती एक गरज आहे. ही भावना प्रत्येक घटकांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. यासाठी पिंपरी चिंचवड परिसरातील पर्यावरण क्षेत्रात कार्यरत सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, गृहनिर्माण संस्था, व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर संस्था व सजग नागरिक यांना एकत्र आणण्यासाठी ‘हरित संगम’ – सहविचार सभा आयोजित करण्यात आली आहे. रविवार दिनांक १७ मे २०२६ रोजी सायंकाळी चार ते आठ या वेळेत नोव्हेल इंटरनॅशनल स्कूल, संभाजी नगर, थरमॅक्स चौक येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये मौलिक विचारांचा व अनुभवांचा संगम होऊन पर्यावरण संवर्धनासाठी नवी दिशा व प्रेरणा मिळेल असा विश्वास आहे. तरी सर्व पर्यावरण प्रेमींनी या हरित संगम मध्ये सहकुटुंब उपस्थित रहावे असे पर्यावरण संरक्षण गतिविधि पिंपरी चिंचवड जिल्हा स्वयंसेवी संस्था प्रमुख श्री मनेश म्हस्के यांनी निमंत्रण केले आहे.अधिक माहितीसाठी संपर्क – ७७०९००७२९२



