लोणावळ्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि आधार फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष प्रकाशभाऊ पाठारे यांचा वाढदिवस औंढे येथे वृक्षारोपण करून साजरा

मावळ मराठा न्युज :- लोणावळा,लोणावळ्यातील सच्चे आणि प्रामाणिक सामाजिक कार्यकर्ते आणि आधार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाश पाठारे यांचा वाढदिवस आज औंढे येथे वृक्षारोपण करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी आधार फौंडेशन चे पदाधिकारी सदस्य तसेच जेष्ठ नागरिक संघांचे पदाधिकारी आणि त्यांचे वर प्रेम करणारे मित्रपरिवार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आधार फाऊंडेशनच्या वतीने सतत आणि नियमित विविध लोक उपयोगी उपक्रम राबवण्यात येतात यात दरमहा धान्यवाटप, रुग्णांसाठी लागणार्‍या अत्यावश्यक वस्तु,फुटपाथवरील गरजुंना हिवाळ्यात ब्लॅकेट वाटप, आदिवासी वाड्यावरील कुटुंबाना कपडे व विद्यार्थ्यांना शालेय वस्तु तसेच खावु वाटप, दरवर्षी दिनदर्शिका प्रकाशन आणि वाटप,लोणावळा नगरपालिका शाळेतील गरजवंत विद्यार्थ्यांना हिवाळ्यात स्वेटर व शुज वाटप, स्वातंत्र्यदिनानिमित्त माजी सैनिकांचा सत्कार व देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रमाचे आयोजन, आरोग्य शिबीर व मोफत औषध वाटप, मोफत नेत्रतपासणी व अल्पदरात चष्मेवाटप,लोणावळ्यातील संगीत प्रेमींसाठी कोण होणार लोणावळ्याचा महागायक? ह्या स्पर्धेचे आयोजन, श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा व भक्तीगीतांचा कार्यक्रम, दरवर्षी पावसाळ्यात वृक्षारोपण, होतकरू विद्यार्थ्यांना दरवर्षी शालेय साहित्याचे वाटप, महाडमधील पुरग्रस्त नागरिकांना धान्य व कपडे वाटप, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींचा सन्मान,इयत्ता १० वी १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आदी कार्यक्रम श्री प्रकाश पाठारे आधार फौंडेशन च्या माध्यमातून राबवित असतात.समाजातील सर्व स्तरातून त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page