सनराइज् एज्युकेशन सोसायटी,पुणे संचालित इन्स्पायर अबॅकस अकॅडमी च्या वतीने राष्ट्रीय अबॅकस स्पर्धा

मावळ मराठा न्यूज:-सनराइज् एज्युकेशन सोसायटी,पुणे संचालित इन्स्पायर अबॅकस अकॅडमी च्या वतीने राष्ट्रीय पातळीची अबॅकस स्पर्धा सरस्वती सांस्कृतिक भवनमध्ये घेण्यात आली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गुणगौरव करण्यात आला. या स्पर्धेसाठी विविध देशाच्या विविध राज्यातून ९७६ विद्यार्थी सहभागी झाले होते. इन्स्पायर अबॅकस अकॅडमी ही आपल्या दर्जेदार शिक्षण, उत्कृष्ट अभ्यासक्रम, गुणवत्ता व प्रशिक्षित शिक्षक वर्ग,वेदिक गणित, बदलत्या काळानुसार ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध करून देणारी अकॅडमी असल्याने गुणवत्तेच्या जोरावर ऍकॅडमीने महाराष्ट्रातील २६ जिल्हे, देशातील १० राज्ये व ४ देशांमध्ये अनेक ठिकाणी आपल्या शाखांचा विस्तार केला असल्याची माहिती सत्यशीलाभद्रे, अर्चना शेळके यांनी यावेळी दिली. स्पर्धेत विविध राज्यातून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी स्वरा शिंदे,पियुष निगळे, आदर्श सानप,भाग्यश्री सानप,अनिरुद्ध चरहाटे,प्रणित देसाई,आदित्य सोनवणे,आदित्य मुळे,समृद्धी थोरवे,केतन पठाडे अबोली पवार ,जान्हवी टेकाळे,सार्थक झगडे,तेजस पातोडे,तनुजा खेडकर,नैतिक शिंदे या विद्यार्थ्यांनी चॅम्पियन ट्रॉफी जिंकली.या स्पर्धेत कु.श्रेया रविंद्र रकटाटे या विद्यार्थिनीने पाच मिनिटात १९५ गणिते अचूक सोडवून नवीन रेकॉर्ड बनवले आहे. यावेळी अकॅडमी च्या वतीने सारिका वारे,कोमल कर्डुले,वंदना वांढेकर,वंदना वाळके, अश्विनी देशमुख,सीमा घाडगे,सारिका जळ मकर,मयुरी वसमतकर व सोमनाथ बोचरे यांना बेस्ट टीचर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.या कार्यक्रमाचे उद्घाटन गोपाळ रक्ताटे (मा. उ. स. पं.स. आष्टी,संस्थापक अध्यक्ष-सुरेश धस नागरी पतसंस्था व निळकंठ दूध संस्था,लोणी स.), सूर्यभान भद्रे (माजी सैनिक), बलभीम शेळके (कृषी अधिकारी श्रीगोंदा) यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अहमदनगर शहराचे विद्यमान आमदार संग्रामभैय्या जगताप व माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार सुरेश आण्णा धस हे उपस्थित होते.तसेच या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सचिन कंद(विभागीय वन अधिकारी अहमदनगर), बाळासाहेब शेकडे(अधीक्षक-धर्मदाय आयुक्त कार्यालय,बीड), सुधीर भद्रे(जिल्हाध्यक्ष-भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन व मा. पं.स.सदस्य ,अहमदनगर),संजय कुमार सरोदे(उपशिक्षणाधिकारी,बीड), विजयकुमार पोकळे(प्राचार्य-रेसिडेनसीयल विद्यालय,अहमदनगर), दादासाहेब दरेकर(नगर तालुकाध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस), दादासाहेब कळमकर(पी.एस.आय,ठाणे) हे होते.सनराइज् एज्युकेशन सोसायटी इन्स्पायर अबॅकस अकॅडमी चे अध्यक्ष प्रदिप भद्रे , सचिवसत्यशीला भद्रे , संचालक दादासाहेब शेळके,संचालक अर्चना शेळके ह्यांनी ह्या अकॅडमीची सुरुवात केली असून ही अकॅडमी सन २०२० पासून कार्यरत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र टाक, प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष प्रदिप भद्रे व आभार प्रदर्शन संस्थेचे संचालक दादासाहेब शेळके यांनी केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page