दिलीप प्रभावळकर,रोहिणी हट्टनगडी या कसलेल्या कलाकारांचा ‘आता वेळ झाली’ इच्छामरण विषयावर भाष्य करणारा सिनेमा २३ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला

मावळ मराठा न्युज :- लोणावळा,जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि रोहिणी हट्टनगडी यांच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर विविध सिनेमा, नाटक, टीव्ही सीरिअल माध्यमातून राज्य करत आहेत. आत्ताची पिढीपर्यंतचा त्यांचा चाहता वर्ग आहे. दिलीप प्रभावळकर माहिती नसलेला माणूस क्वचितच असेल,त्यांच्या चाहत्यावर्गासाठी एक आनंदाची बातमी समोर येतेय. लवकरच त्याचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनंत नारायण महादेवन दिग्दर्शित, लिखित ‘आता वेळ झाली’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर झळकले असून पोस्टरमध्ये दिलीप प्रभावळकर आणि रोहिणी हटंगडी दिसत आहेत. या चित्रपटाची घोषणा अभिनेते प्रतीक गांधी यांनी आपल्या सोशलमीडियावरुन केली आहे. सत्य घटनेवर आधारित आणि त्यातून सरत चाललेली वेळही दिसतेय. ‘इफ यू वाँट अ हॅप्पी एण्डिंग, यू मस्ट नो व्हेअर टू एण्ड युअर स्टोरी’ अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. या ओळीचा या चित्रपटाशी नेमका काय संबंध आहे,याचे उत्तर आपल्याला २३ फेब्रुवारी रोजी चित्रपट आल्यावरच कळणार आहे.अशी माहिती हॉटेल चंद्रलोक येथे जेष्ठ नागरिक संघ लोणावळा आयोजित अंध श्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यक्रमात अभिनेता पटेकर यांनी दिली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page