लोणावळा नगरपरिषदेत स्वच्छता कर्मचारी कर्मचारी कंत्राटी व नियमित इतर कर्मचारी,अधिकारी आरोग्य शिबिराचे आयोजन

मावळ मराठा न्युज -लोणावळा, ७ फेब्रुवारी २०२५ लोणावळा नगरपरिषदेत स्वच्छता कर्मचारी (कंत्राटी व नियमित )इतर कर्मचारी तसेच अधिकारी यांच्यासाठी एक विशेष आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराद्वारे सर्व कर्मचार्‍यांची व अधिकाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली गेली. शिबिरात रक्तदाब, रक्तसाखर, एक्स-रे कोलेस्ट्रॉल, उंची, वजन यासारख्या आरोग्य तपासण्यांसोबतच, विविध आरोग्य समस्यांसाठी वैद्यकीय सल्ला देखील देण्यात आला.तपासणीनंतर कर्मचार्‍यांना आवश्यक ते मोफत औषधे देखील वितरित केली गेली. यामुळे कर्मचार्‍यांचे आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत होईल आणि त्यांच्या कामाच्या कार्यक्षमतेवर सकारात्मक प्रभाव पडेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.लोणावळा नगरपरिषदेतून असे उपक्रम नियमितपणे राबवले जात आहेत, ज्यामुळे कर्मचार्‍यांच्या भल्यासाठी तसेच त्यांच्या कार्यक्षमतेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page