लोणावळा शहर व परिसर वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी नियोजन आराखडा तयार करणार -बापूसाहेब भेगडे

मावळ मराठा न्युज :-लोणावळा : लोणावळ्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी परिसराचा सुरक्षित, स्वच्छ आणि समृद्ध विकास हे ध्येय समोर ठेवत मावळ विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी नागरिकांना चौफेर विकासाची ‘हमी’ दिली आहे. तसेच लोणावळा शहर व परिसर वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी नियोजन आराखडा तयार करणार असल्याचेही भेगडे यांनी नागरिकांना आश्वासन दिले. बापूसाहेब भेगडे यांनी लोणावळ्यातील वलवण, नांगरगाव, कैवल्यधाम, पांगलोळी, तुंगार्ली, इंदिरानगर, गवळीवाडा, खंडाळा (नेताजीवाडी), बॅटरी हिल, खंडाळा गावठाण, रायवूड, भुशी /रामनगर, कैलासनगर (हुडको), भांगरवाडी, लोणावळा बाजारपेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सुमित्रा हॉल आदी परिसराला भेटी देत पिपाणी चिन्हा समोरील बटण दाबून मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत भेगडे यांचे औक्षण केले. फटाक्यांची आतिषबाजी, फुलांच्या पायघड्या घालत व्यापाऱ्यांनी, तसेच नागरिकांनी उत्साहात स्वागत केले. यावेळी प्रचारप्रमुख रवींद्र भेगडे, शिवसेना तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, माजी नगरसेवक प्रमोद गायकवाड, माजी नगरसेवक निखिल कवीश्वर, राजू बच्चे, गौरीताई मावकर, संतोष मुऱ्हे, सुभाष जाधव, ग्रामस्थ, व्यापारी, रिक्षाचालक संघटनांचे पदाधिकारी, महिला आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांशी संवाद साधताना बापूसाहेब भेगडे म्हणाले, की मावळ तालुक्याची अंमली पदार्थाच्या विळख्यातून मुक्तता करणे आणि व्यसनाधीन तरुणांना पुनर्वसनाच्या मदतीने योग्य मार्गावर आणणे, मतदारसंघात उत्तम दर्जाचे शैक्षणिक उपक्रम आणणे, तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी केंद्र, राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची हमीसुद्धा मी देत आहे. आशिष ठोंबरे म्हणाले, की अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्या रूपाने मावळ तालुक्याला दमदार आमदार लाभल्यास त्यांच्या निधीमधून लोणावळा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विकासाची कामे करत सर्व भौतिक सुविधा नागरिकांना पुरवण्यात येतील. मतदार संघातील प्रत्येक नागरिकाने सुखी जीवन जगावे, त्यांच्या कुटुंबाचे संरक्षण व्हावे, त्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी एक निश्चित विकासाचा कृती आराखडा बापूसाहेब भेगडे यांनी तयार ठेवला आहे. बापूसाहेब भेगडे यांना लोणावळ्यातील सर्व भागातून मोठे मताधिक्य मिळवून देणार आहोत. लोणावळा हे पर्यटन केंद्र असल्याने वाहतूककोंडीची समस्या सोडविणे खूपच अत्यावश्यक बनले आहे. लोणावळ्यातील वाहतूक व्यवस्थापन आणि वाहतूक कोंडीमुक्त मतदारसंघासाठी योग्य वाहतुकीचे नियोजन करून शिस्तबद्ध व्यवस्था उभारली जाईल. आमदार सुनील शेळके विश्वासघातकी माणूस आहे. याच विश्वासघाताने मावळची समृद्धता नष्ट करण्याचे काम केले. पाच वर्षे विकासकामे न करता फक्त चमकोगिरी केली आहे. गुन्हेगारीमुक्त आणि सुरक्षित मावळ ही पहिली हमी बापूसाहेब भेगडे यांनी दिली आहे. -रवींद्र भेगडे, प्रचारप्रमुख, मावळ विधानसभा

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page