महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली,हिंदुजा रुग्णालयात दाखल


मावळ मराठा न्युज :-मुंबई,सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली आहे. त्यांना उपचारासाठी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत आहे. याआधीही शिवसेना नेते मनोहर जोशी यांना ब्रेन हॅमरेजमुळे हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या वर्षी मे महिन्यात ८६ वर्षीय ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना ब्रेन ट्यूमर झाल्याचे निदान झाले. मात्र, काही दिवसांत त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. पुन्हा प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.




