सिंहगड इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संजना बोहोराचा राज्यस्तरीय प्रेरणा नेतृत्व गुण विकास शिबिरात सहभाग


मावळ मराठा न्यूज लोणावळा सिंहगड इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी येथील राष्ट्रीय सेवा योजनेची विद्यार्थीनी संजना बोहोरा हीने राज्यस्तरीय नेतृत्व गुण विकास शिबिर “प्रेरणा” या मध्ये सहभाग घेतला. महाराष्ट्र शासन व राष्ट्रीय सेवा योजना यांच्याकडून राबविण्यात येणाऱ्या प्रेरणा या शिबिरात राज्यभरातून 36 विद्यापीठातील 166 विद्यार्थी समाविष्ट होते, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून 17 विद्यार्थी पाठवण्यात आले त्या मध्ये संजना हीची वर्णी लागली. हे शिबिर नेरळ येथे दि. 17 ते 22 फेब्रुवारी 2024 दरम्यान पर पडले. शिबिरदरम्यान विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मार्गदर्शन, उत्कृष्ट दिनचर्या, सांस्कृतिक कार्यक्रम बसवणे, योगाभ्यास, इत्यादी कार्यक्रम राबविण्यात आले. “सदरचे शिबिर हे माझ्या आयुष्याला कलाटणी देणार होत आणि खूप गोष्टी शिकायला मिळाल्या” असे मत संजना हीने नोंदवले. सदर निवड प्रक्रियेसाठी प्राचार्य डॉ. एम एस गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी श्री संतोष दबडे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. या कार्याबद्दल सिंहगड एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. एम. एन. नवले, संस्थापक सचिव डॉ. (मिसेस) सुनंदा नवले, संस्थेच्या लोणावळा कॅम्पसचे संचालक डॉ. एम. एस. गायकवाड, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. के. एन. गुजर, एस.के.एन सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. एम. एस. रोहोकले, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. पार्थ नाथ, निवृत्ती बाबाजी नवले कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्सचे प्राचार्य व्ही. बी. ढोले, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ बिजनेस ऍडमिनिस्ट्रेशन अँड कॉम्प्युटर ऍप्लिकेशच्या संचालिका डॉ. विद्या नखाते, सिंहगड पब्लिक स्कूलचे प्राचार्य डॉ. एन. के. मिश्रा, काशीबाई नवले कॉलेज ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंगचे प्राचार्य डॉ. शिवाजी देसाई यांसह प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केल




