ॲटो रिक्षा चालक अनिल तांबे यांच्या प्रामाणिकपणामुळे महिलेला मिळाला तिचा पन्नास हजार रुपये किंमतीचा आयफोन मोबाईल



मावळ मराठा न्युज :-पिंपरी,प्रतिनिधी, सकल मातंग समाजाचे कार्यकर्ते ॲटो रिक्षा चालक अनिल तांबे यांना रात्री बाराच्या सुमारास महीला भगिनी रिक्षाने प्रवास करीत असताना त्यांचा मोबाईल अनिल तांबे यांच्या रिक्षात विसारला होता.ॲटोरिक्षा चालक अनिल तांबे यांनी ही गोष्ट शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले व चंद्रकांत दादा लोंढे यांच्या निदर्शनास आणुन दिली.तात्काळ अंजिली राजमाटे हे थेरगाव रूग्णालयात नर्सचे काम करित आहे त्यांना फोन करून वाकड पोलिस स्टेशन या ठिकाणी बोलावून पन्नास हजार रूपये किंमतीचा आयफोन परत दिला. वाकड पोलीस स्टेशनचे गायकवाड साहेब यांच्या हस्ते तो आयफोन दिला.रिक्षा चालक अनिल तांबे यांचे पोलिस प्रशासनाने अभिनंदन केले. तसेच युवराज दाखले व चंद्रकांत दादा लोंढे यांनी सकल मातंग समाजाच्या वतीने कौतुक केले.




