वडगाव मावळ येथील न्यायालयात अॅड. पुष्कर पाटील सर यांचे Electronic Evidence या विषयावर व्याख्यान संपन्न



मावळ मराठा न्युज,वडगाव मावळ दिनांक:-२८ फेब्रुवारी,२०२४,वडगाव मावळ लिगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने वडगाव मावळ न्यायालयातील वकीलांसाठी Electronic Evidence या विषयावर पुणे येथील सुप्रसिद्ध फौजदारी वकील अॅड. पुष्कर पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. वडगाव मावळ लिगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ही वडगाव न्यायालयातील वकीलांसाठी काम करणारी एक नामांकित संस्था असून वकीलांचे व पक्षकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असते. यावेळी Electronic Evidence मा. न्यायालयात कसा दाखल करायचा, त्याची कार्यपद्धती कशी आहे, तसेच कॅमेरा, मोबाईल, संगणक, पेन ड्राइव्ह यांसारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांमधील डाटा व त्याची हॅश वॅल्यू, भारतीय पुरावा कायद्याच्या कलम ६५ ( B) अन्वये Electronic Evidence चे प्रमाणपत्र दाखल करावयाची पद्धत यांसारख्या अत्यंत महत्वाच्या विषयांवर अॅड. पाटील यांनी सविस्तरपणे मार्गदर्शन केले. तसेच अनेक मा. उच्च न्यायालये व मा. सर्वाेच्च न्यायालयाच्या अनेक न्यायनिर्णयांचे दाखलेही पाटील यांनी दिले. यावेळी उपस्थित असलेल्या वकीलांच्या प्रश्नांचे व शंकांचे समाधान अॅड पुष्कर पाटील यांनी केले. पाटील यांच्या मार्गदर्शनाचा लाभ निश्चितच सर्व वकिलांना न्यायालायातील कामात होईल असे मत उपस्थित वकिलांनी यावळी व्यक्त केले. यावेळी अॅड. पुष्कर पाटील यांचा वडगाव मावळ लिगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला. यावेळी असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष अॅड. सोमनाथ पवळे, उपाध्यक्षा अॅड. प्रिया पंडीत, अॅड. मोनाली कुलकर्णी शेलार, सचिव अॅड. सचिव प्रणोती पिंगळे, सचिव अॅड अक्षय रौंधळ, खजिनदार अॅड. मिनाक्षी ढोरे म्हाळस्कर, मा. अध्यक्ष अॅड. धनंजय कोद्रे, अॅड. अजित वहिले, मा. सचिव अॅड. राम शहाणे, अॅड हेमंत साबळे, कार्यकारिणी सदस्य अॅड. सुबोध कालेकर, अॅड. प्रियांका शिंदे, अॅड. स्नेहा परदेशी, अॅड. रोहित कदम, अॅड. युक्ता पवार, अॅड.सागर शेटे, अॅड. करण लोंढे यांसह अनेक वकिल बंधू- भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. हेमंत साबळे यांनी केले तर आभार अॅड. राम शहाणे यांनी मानले.




