बंदिस्त जलवाहिनी गोळीबार प्रकरण, ९ ऑगस्ट, स्मृतिस्थळावर शहीद यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण

मावळ मराठा न्युज:- मावळ,९ ऑगस्ट क्रांती दिनी पवन मावळ भागातील प्रसिद्ध पवना धरणातून थेट बंदिस्त जलवाहिनी द्वारे पाणी नेण्यास विरोधात पुकारलेल्या आंदोलनात पवना नगर येथील ३ शेतकरी अमानुष गोळीबारात शहीद झाले होते.शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)यांच्या वतीने आजचा दिवस शहीद दीन म्हणून पाळला जातो. गेले १४ वर्ष स्मृतिस्थळावर श्रद्धांजली अर्पण करण्यात येते. त्या निमित्त शिवसेना जिल्हा संघटक माजी जिल्हा प्रमुख मच्छिंद्र खराडे,मावळ तालुका समन्वयक अनिल ओव्हाळ,माजी सरपंच अनिल भालेराव,शहर प्रमुख सुरेश गुप्ता,सनी मोहिते,माजी उपसरपंच शाम बाबू वाल्मिकी, सदानंद पिलांने, सुनिल इंगुळकर,सतीश गोंते,अजय. ढम आदी मान्यवर उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page