लायन्स क्लब ऑफ मेट्रोपॉलिसकडून वायसीएममध्ये डायलिसिस मशीनचे लोकार्पण

मावळ मराठा न्युज :-पिंपरी,(प्रतिनिधी) लायन्स क्लब ऑफ़ पुणे मेट्रोपॉलीस आणि अल्ट्रा कॉर्पोटेक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने वायसीएम रुग्णालयामध्ये सुरू करण्यात आलेल्या डायलिसिस मशीनचे लोकार्पण आज करण्यात आले. यावेळी क्लबचे अध्यक्ष शंकर गावडे, सचिव महेंद्र परमार, खजिनदार रामचंद्र माने डिस्ट्रिक्ट ३२३४डी२ चे प्रांतपाल विजय भंडारी, प्रतिभा इन्स्टिट्यूट समूहाचे अध्यक्ष डॉ दीपक शहा, माजी महापौर योगेश बहल वायसीएमचे अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार,रिजन चेअरमन धनराज मंगनाणी ज्येष्ठ लायन सदस्य अनुप ठाकूर,मनोज बंसल,संदीप पाटील, मिलिंद रणदिवे,नागेन्द्र शेरेगर. प्रकल्प प्रमुख गुलशन पाल, प्रकल्प अध्यक्ष भरत इंगवले,अल्ट्रा कॉर्पोटेक कंपनीचे संचालक प्रमोद भोसले, व लायन्स सभासद उपस्थित होते. प्रांतपाल भंडारी म्हणाले कि, समाजसेवेसाठी उपयुक्त असे कायमस्वरूपी प्रकल्प हे लायन्सचा आत्मा आहे. लायन्स क्लबच्या माध्यमातून ९५ वे डायलिलिस मशिन बसवले. डायलिसिस सारखे वैद्यकीय सुविधा रुग्णालयात सुरू करताना आम्हाला आनंद होत नाही, मात्र हि समाजाची गरज बनली आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे ३०/३५ वयातील तरुणाई डायलिसीसीवर उपचार घेतात हि धोक्याची घंटा आहे. यावररक्तदाब, मधुमेह यावर अधिक लक्ष देण्याची गरज.वर्दळीच्या ठिकाणी त्वरित चेक करण्याची मशिन बसवता येईल यावर विचार व्हावा.डॉ.दादेवार म्हणाले कि, रक्तदाब आणि मधुमेह टाळण्यासाठी नियमित व्यायाम करावा, गोड आणि मीठ खाणे टाळावे. वयाच्या ३० नंतर दर ६ महिन्याने रक्तदाब आणि मधुमेह तपासणी केली पाहिजे.काहीच लक्षणे दिसत नाही नाहीत म्हणून उपचार घेण्यास टाळाटाळ करू नका. अन्यथा किडनी निकामी होवून डायलिलिस सुरू करण्याची गरज भासेल.योगेश बहल म्हणाले कि, वायसीएम स्तुत्य उपक्रम आहे.विज्ञान प्रगतीमुळे हालचाली कमी तणाव वाढत यामुळे व्याधींमध्ये वाढ झालेली आहे.यामुळे तरुणाई मध्ये व्याधी आढळून येत आहे.डॉ. दिपक शहा म्हणाले कि,लायन्स क्लबने सुरू केलेले कायमस्वरूपी उपक्रम हे स्मृति मंदिरे आहेत.हे सेवा मंदिरे बनावी.डायलिलिसवर तरुण रुग्ण दिसून आले हि चिंताजनक बाब आहे.श्री.भोसले म्हणाले समस्या उद्भवण्या पूर्वी त्यावर उपाय केली पाहिजेत.दररोज मेडिटेशन, व्यायाम, योगासने केल्यास निरोगी आयुष्य जगता येईल आणि डायलिसिससारख्या वैद्यकीय यंत्रणेवर ताण येणार नाही. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ला. विश्वजीत बेडगे, ला. भरत इंगवले यांनी केले. तर आभार डायलिसिस प्रकल्प समन्वयक गुलशन पाल यांनी आभार मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page