अनाम प्रेम,मोरे काका,टेल्को महिला गृह उद्योग व ज्येष्ठ नागरिक संघ लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने अभिनव उपक्रम,सैनिकांसाठी दिवाळी फराळ!




मावळ मराठा न्युज:-लोणावळा,सीमेवर आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी दिवाळी फराळ बनवण्याचा उपक्रम अनाम प्रेम,मोरे काका,टेल्को महिला गृह उद्योग व ज्येष्ठ नागरिक संघ लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने हे कार्य करण्यात आले . सैनिकांसाठी दिवाळी फराळ पॅकिंग करण्यात जेष्ठांना या अभिनव उपक्रममध्ये सहभाग घेण्याची संधी मिळाली त्याबद्दल अनाम प्रेम आणि टेल्को महिला गृहउद्योग यांचे जेष्ठ नागरिक संघ कडून आभार मानण्यात आले. अशी संधी दिल्याबद्दल सारिका पाळेकर व संतोष पाळेकर यांचे विशेष आभार जेष्ठानी मानले. बारा ते तेरा ज्येष्ठ महिला व पुरुष टेल्को कंपनीत जाऊन पॅकिंग करण्यामध्ये सहभाग घेतला. संघाचे अध्यक्ष पांडुरंग तिखे, गोरख चौधरी, मृदुला पाटील, शोभा मांढरे, शारदा अग्रवाल, ज्योती रांगणे, संगीता नाईक, एन डी पाटील, दत्ता लाड, अनंता देशमुख, कालिदास खेंगरे, जाईबाई रौंदळ, सुचित्रा चांदोरकर यां सर्वांनी या कार्यात सहभाग घेऊन पॅकिंग करण्यास मदत केली व आपल्या जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने अनाम प्रेम संघटनेला एक छोटीसी आर्थिक मदत देखील यावेळी करण्यात आली.




