कान्हे येथील उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण,मावळ तालुक्याला विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही – अजित पवार

मावळ मराठा न्युज :- कान्हे,मावळचा नियोजनबध्द विकासासाठी,पर्यटनास चालना देण्यासाठी निधीची निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मावळ तालुक्यातील कान्हे येथील उपजिल्हा रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरचे लोकार्पण सोहळा, टायगर पॉईंट येथील ग्लास स्कायवॉक तसेच विविध विकास कामांचे भूमिपूजन करताना केले.यावेळी आमदार सुनील शेळके, तहसिलदार विक्रम देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगेमाजी आमदार श्रीमती रुपलेखाताई ढोरे,आरपीआयचे नवोदित प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रमेश साळवे,माजी सभापती विठ्ठल शिंदे, सुरेश चौधरी, राष्ट्रवादीच्या महिला तालुकाध्यक्षा दिपाली गराडे आदी उपस्थित होते. अजित दादा म्हणाले, आपल्याला महाराष्ट्राचे उज्वल भविष्य निर्माण करायचे असेल, तर केंद्रातील मोदी सरकारच्या विचारांचे सरकार महाराष्ट्रात आणले पाहिजे. यासाठी महायुतीच्या सर्व मित्र व घटक पक्षांनी जिथे ज्या पक्षाच्या उमेदवारांना उमेदवारी दिली जाईल. त्यांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहून त्यांना प्रामाणिकपणे निवडून आणायचे आहे. प्रत्येकाने महायुतीचा उमेदवार म्हणूनच त्यांना मतदान करायचे आहे. आपली अनेक दशकांपासूनची जी मागणी होती की, आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. परंतु आतापर्यंत अनेक सरकारे आली व गेली. त्यांनी याकडे गांभीर्याने घेतले नाही. अखेर काल घटस्थापनेच्या दिवशीच केंद्रातील मोदी सरकारने आपल्या मराठी मातृभाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. आपल्या तमाम महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मोदी सरकारचे आभार मानतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मत व्यक्त केले. सुनील शेळके यांनी त्यांच्यावर टीका टिपणी करणारे व तालुक्यातील कार्यकर्ते व जनतेवर दहशत व दबाव निर्माण करणाऱ्यांचा समाचार घेतला. त्यांना धारेवर धरत आपल्या शैलीत इशारा दिला. जर कोणी तालुक्यातील जनतेवर दहशत व दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर मीही जनतेच्या साठी मागेपुढे पाहणार नाही असा इशारा सुनील शेळके यांनी दिला. त्यांच्या या विधानावर अजित दादांनी सुनील ची गाडी फारच झाली गरम होती. पण राजकीय व सामाजिक जीवनात सबुरीची गरजेची असते असा सबुरीचा सल्ला दिला. आपल्याला सर्वांची गरज आहे, आपल्याला कोणाला विनाकारण नाराज करायचे नाही. अशाने फार काही साध्य होत नाही. पण आपण चांगले काम केल्यानंतर मनाला वेदना होणारच असे मत व्यक्त केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page