इनोव्हिजनच्या माध्यमातून विकसित भारतचे स्वप्न साकार- कुलगुरू डॉ भिरुड


मावळ मराठा न्युज :-पिंपरी(प्रतिनिधी) विद्यार्थ्यांसाठी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी इनोव्हिजन तांत्रिक महोत्सव हक्काचे व्यासपीठ आहे. यातूनच विद्यार्थी स्वतः चे स्टार्टअप सुरू करतील.अशा प्रकारे इनोव्हिजनच्या माध्यमातून विकसित भारत होण्याचे स्वप्न साकार होईल. असा विश्वास सीओईपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ सुनील भिरूड यांनी व्यक्त केला. जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ताथवडे शैक्षणिक संकुलाच्या वतीने विकसित भारत या संकल्पनेवर आयोजित करण्यात आलेल्या इनोव्हिजनचे उदघाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या वेळी शेफलर इंडिया कंपनीच्या मनुष्यबळ विकास विभागाचे उपाध्यक्ष शंतनू घोषाल,फॉक्सबेरी टेक्नॉलॉजीचे सीइओ अंकित भार्गव, जेएसपीएमचे संचालक अनिल भोसले,, ताथवडे शैक्षणिक संकूल संचालक प्रा सुधीर भिलारे,श्री रवी सावंत, शाहू इंजिनिअरिंग कॉलेजचे संचालक डॉ राकेश जैन, उप संचालक डॉ.अविनाश देवस्थळी, इथान टेकच्या निखत सय्यद, फार्मसीचे कॉलेजचे प्राचार्य डॉ.किशनलाल खंडेलवाल, इनोव्हिजनचे समन्वयक डॉ नीहार रंजन आदी मान्यवर उपस्थितीत होते. यंदा”विकसित भारत अभियान ” या संकल्पनेवर आधारित हा तांत्रिक महोत्सव आहे.यावेळी डॉ जैन म्हणाले कि, विद्यार्थ्यांमध्ये तंत्रज्ञानाचा विकास अधिकाधिक करण्यासाठी इनोव्हिजनचा उदय झाला.श्री घोषाल म्हणाले की, विद्यार्थ्यांचा खरा प्रवास महाविद्यालयातून बाहेर पडल्यानंतर सुरू होतो.त्यामुळे महाविद्यालयामध्ये तो शैक्षणिक पाया भक्कम करावा.आपण कायम विद्यार्थी असतो. शिक्षणाच्या आधारे नवीन टेक्नॉलॉजी आत्मसात करून त्याचा समाजासाठी उपयोग करावा.श्री. भार्गव म्हणाले की, विद्यार्थ्यांनी,अभ्यासाबरोबर वेगवेगळ्या इतर भाषेवर प्रभुत्व असणे गरजेचे आहे.संस्थेचे संचालक श्री भोसले यांनी सांगितले की,आपल्या सभोवताली जे प्रश्न आहेत ते डोळसपणे पाहून त्यावर उत्तर शोधणे गरजेचे आहे. आजचे तंत्रज्ञान सामान्य माणसाच्या उपयोगात कशी येईल हे विद्यार्थ्यांनी पाहणे गरजेचे आहे.यावेळी राजर्षी शाहू अभियांत्रिकी कॉलेज, व्यवस्थापन, डिप्लोमा आणि फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी इनोव्हिजन ‘या राष्ट्रीय स्तरावरील सामाजिक-तांत्रिक महोत्सव असून विद्यार्थी त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन केले जाते. या महोत्सवामध्ये आभासी वास्तव, इन्फिनिटी, प्रकल्प , इनोव्हाटॅक्स , टेक्नोत्सव, ड्रोन आर्केड, ऑटोमेशन असेंशन, अविण्य, शार्क टॅंक, टेक्नो मंथन , अभ्युदय, टेकप्रवी, निर्माण, कोडमनिया, टेक्नोज्ञान, मॅकेथॉन , फर्मझेस्ट, ई कंटेंट डेव्हलपमेंट,व्हीआर झोरिझोन यांचा समावेश होता. या तांत्रिक महोत्सवात देशभरातील नामांकित महाविद्यालये आणि प्रतिष्ठित संस्थांमधील 10,000 हून अधिक अभियांत्रिकी, व्यवस्थापन, डिप्लोमा आणि फार्मसीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. आयोजनासाठी डॉ. दीपमाला साळुंखे, डॉ. गीतांजली माटे आणि डॉ.अविनाश बडधे,डॉ पल्लवी टेकाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.




