पिंपरी-चिंचवडचे सुपुत्र पैलवान काळुराम लांडगे यांचा कोल्हापुर येथे “राज्यस्तरीय निस्वार्थी समाजसेवा गौरव








मावळ मराठा न्युज नेटवर्क -दि.११.०१.२०२६ कोल्हापुर येथे महाराणी ताराबाई हॉल कलकल ग्रुप शेजारी बजपराव तालीम समोर नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात मंथन फाऊँडेशन राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न झाला.त्यामध्ये महाराष्ट्रातुन १०० पुरस्कारर्थींना विविध क्षेत्रात उल्लेखनिय सामाजिक काम करणार्यांना पुरस्कार देण्यात आले यामध्ये कासारवाडी येथील पैलवान काळुराम लांडगे यांना धार्मिक , शैक्षणिक , क्रिडा , कला , आरोग्यविषयक , पर्यावरण , राजकिय , सांस्कृतिक , पत्रकारिता ,अशा अनेक वर्ष समाजप्रबोधनाचे समाजकार्य निरपेक्षपणे आणि निस्वार्थपणे करत असल्यामुळे या सेवाभावी कार्याची दखल घेऊन पैलवान काळुराम लांडगे यांना कार्यक्रमातील सन्माननिय प्रमुख पाहुणे आंतरराष्ट्रीय आध्यात्मिक मार्गदर्शक साध्वी माताजी , शिवराज विद्यालय व कॉलेजचे संस्थापक , गडहिंग्लजचे लेखक व कवी प्रा.किसनराव विठ्ठलराव कुराडे , रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथील जेष्ठ पत्रकार व जीवन ज्योती मतिमंद मुलांची शाळेचे अध्यक्ष श्री.शरद मोरे यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह , सन्मानपत्र , शाल , नारळ देऊन सर्वोत्कृष्ठ समजला जाणारा ” राज्यस्तरीय निस्वार्थी समाजसेवा गौरव पुरस्कार २०२६ ” हा बहाल करण्यात आला यावेळी अॅड. विनोद मुसळे , स्नेहलोक फाऊँडेशनचे संस्थापक अध्यक्ष अॅड. शैलेंद्र पंडीत , संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.सागर शेळके , उपाध्यक्ष श्री.अग्नेल चव्हाण ,श्री.सचिन पवार उपस्थित होते.कार्यक्रम संपुर्ण पारपाडण्यासाठी संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाच्या वेळी सर्व पुरस्कार्थी , पुरस्कार्थींचे नातेवाईक व नागरिकांनी भरपुर गर्दि केली होती.



