सारथी संस्थे मधील पिएचडी धारक विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला संभाजी ब्रिगेड चा जाहीर पाठिंबा



मावळ मराठा न्युज :-पुणे, बारर्टी संशोधक विद्यार्थ्यांप्रमाणे सारथी संशोधक विद्यार्थ्यांना १००% शिष्यवृत्ती देण्यात यावी या मागणीसाठी सारथी संस्था पुणे या ठिकाणी पीएचडी धारक विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण सुरू आहे या उपोषणाला संभाजी ब्रिगेडने जाहीर पाठिंबा दिला यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष Ad.मनोज आखरे म्हणाले दिनांक २५/०७ /२०२४ च्या शासन निर्णयानुसार सारथी बारर्टी व महाज्योती या तिन्ही संस्थेच्या ३० ऑक्टोबर २०२३ पूर्वी अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ५० % दराने आधीछात्रवृत्ति कागदपत्रे पडताळणी करून देण्याबाबत निर्देश दिले होते.परंतु दिनांक २५ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या मा. मंत्रिमंडळाच्या बैठकीत बारर्टीच्या ७६३ विद्यार्थ्यांना १०० % आधीछत्रवृत्ती देण्याबाबत निर्णय झाला आहे. त्यासाठी ३७ कोटीच्या खर्चास मान्यता शासनाने दिलेली आहे.मात्र यामध्ये सार्थीच्या ९६९ व महाज्योतीच्या ८०० विद्यार्थ्यांना आधी छात्रवृत्ति देण्याबाबत उल्लेख नाही हा शासन निर्णय सारथी व महाज्योतीच्या विद्यार्थ्यांसाठी समान तत्वाला धरून नाही. त्यामुळे सारथी व महाज्योतीच्या विद्यार्थ्यांवर हा निर्णय अन्यायकारक आहे. शासनाने या मंत्रिमंडळाच्या निर्णयावरती पुनर्विचार करून सारथी व बारर्टी तसेच महाजोतीच्या विद्यार्थ्यांना यू.जी.सी. प्रमाणे १०० % आधीछात्रवृत्ति देण्याचा त्वरित शासन निर्णय द्यावा. अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.यासाठी विद्यार्थ्यांनी सारथी मुख्य कार्यालय पुणे या ठिकाणी आमरण साखळी उपोषण सुरू केलेले आहे.या विद्यार्थ्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे अमर उपोषण या ठिकाणी सुरूच राहणार आहे.याची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी तसेच विद्यार्थ्यांच्या मागण्या त्वरित मान्य करण्यात याव्यात.अन्यथा विद्यार्थ्यांच्या न्याय आणि हक्कासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन सुरू केली जातील. प्रश्न सुटले नाहीत तर पुढील काळात होणाऱ्या उद्रेकास प्रशासन जबाबदार राहील.असा विनंती वजा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आलायावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष एडवोकेट मनोज साखरे प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गाडगे पुणे शहराध्यक्ष अविनाश मोहिते आधी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




