म.गांधी शांति प्रतिष्ठान राष्ट्रीय लोक आंदोलन आयोजित शेतकरी संघटनांच्या मेळावा संपन्न



मावळ मराठा न्यूज :- दिली,दिल्ली येथील म.गांधी शांति प्रतिष्ठान येथे राष्ट्रीय लोक आंदोलन आयोजित करण्यात आली. यात सहा राज्यातील शेतकरी संघटनांच्या प्रतिनीधी यांनी सहभाग घेतला.या सभेत विचार मांडतांना राष्ट्रीय लोक आंदोलनाचे राष्ट्रीय सरचिटणीस अशोक सब्बन,समवेत दशरथभाई राजस्थान,राष्ट्रीय अध्यक्षा कल्पना ईनामदार मुंबई, दत्तात्रेय आवारी राळेगणसिद्धी,सुखदेवसिंग विर्क हरीयाना, ॲड. योगेद्र पारीक राजस्थान,तिनशेसाठ खाप पंचायतीचे प्रमुख जगदिश सोलंकी आदी मान्यवर उपस्थित होते. यात राष्ट्रीय लोक आंदोलनाचे सरचिटणीस अशोक सब्बन यांनी आपले मोलाचे विचार मांडले.



