संपर्क संस्थेच्या अति दुर्गम भागातील भांबर्डे येथील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास झाला सुखकर

मावळ मराठा न्युज – भांबर्डे,दिनांक गुरुवार दिनांक १४ मार्च २०२४ रोजी नाईट फ्रैंक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांच्याकडून संपर्क संस्थेच्या संपर्क ग्रामीण विद्या विकास केंद्र भांबर्डे तालुका मुळशी जिल्हा पुणे शाळेला शालेय विद्यार्थ्यांसाठी स्कूल बस अर्पण करण्यात आली. या स्कूल बस मुळे भांबर्डे परिसरातील वीस किलोमीटरवरील अंतरातील विद्यार्थ्यांची पायपीट आता थांबणार आहे. नाईट फ्रैंक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून विद्यालयाच्या सांस्कृतिक हॉल व शाळा इमारती वरील पत्रे बदलण्यात आली असून वस्तीगृहातील निवासी असणाऱ्या शंभर विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक लॉकर्स कपाट देण्यात आली आहे. याप्रसंगी महिला दिनाचे औचित्य साधून प्रकल्पातील सर्व महिला कर्मचारी व शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर करून पाहुण्यांची मने जिंकली. या कार्यक्रमासाठी शिशिर बैजल अध्यक्षव व्यवस्थापकीय संचालक नाईट फ्रँक इंडिया प्रायव्हेटलिमिटेड कंपनी, सौ. साधना बैजल,अमित कुमार बॅनर्जी,संस्थापक, सचिव संपर्क संस्था, अनुज कुमार सिंग, सीईओ संपर्क संस्था निशिध उपाध्याय,एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर ह्युमन रिसोर्स, मा. श्रीराम कुमठेकर,ज्येष्ठ पत्रकार लोणावळा,मा. सौ. नवनिता चटर्जी,सीनियर प्रोग्राम ऍडव्हायझर, संपर्क संस्था, सतीश माळी,प्रोग्राम मॅनेजर, संपर्क संस्था. दत्ताभाऊ दिघे,उपसरपंच, भांबर्डे श्नितीन डुके,ग्रामसेवक, भांबर्डे,एकनाथ दिघे, गोविंद सरूसे, मा.जयराम दिघे, श्रीराम वायकर, सर्व मा. सरपंच भांबर्डे, विनायक कोकरे मा. सरपंच, वांद्रे, संतोष गोरे,पोलीस पाटील पिंपरी,तानाजी दिघे, अंकुश दहिभाते, किसन दिघे सामाजिक कार्यकर्ते,इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तसेच भांबर्डे, गोठे, आडगाव, आहिरवाडी तैलबैल, कदम बारपे इत्यादी धरणग्रस्त भागातील पालक मंडळी बहुसंख्येने व नाईट फ्रैंक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे उच्चस्त पदाधिकारी, संस्थेतील सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कंपनीचे अध्यक्ष शिशिर बैजल यांनी आपल्या भाषणातून ” संपर्क संस्था शैक्षणिक वसामाजिक क्षेत्रातील करीत असलेल्या आदिवासी मुलांसाठीच्या कामाचे कौतुक केले. भविष्यात संस्थेस मदत करण्याचे आश्वासन दिले.”सर्व मान्यवरांचे स्वागत अमित कुमार बॅनर्जी यांनी, कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक दत्तात्रय चाळक, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक रफिक पठाण व सर्वांचे आभार सहाय्यक प्रकल्पअधिकारी हिरामण कोकणे यांनी मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page