वाकसई गावचे ग्रामदैवत श्री वनोबा महाराज यांचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा



मावळ मराठा न्युज -लोणावळा, मावळ तालुक्या मध्ये पारंपारिक पद्धतीने आज देखील ग्रामदैवतांचे उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. नुकताच वाकसई गावचे ग्रामदैवत असलेले श्री वनोबा महाराजांचा उत्सव ११ ते १३ फेब्रुवारी याकाळात भव्य अशा बैलगाडी स्पर्धा तर कुस्त्यांचा आखाडा करमणूकीचा कार्यक्रमाचे आयोजन करुन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामदैवताच्या उत्सवानिमित्त श्री वनोबा महाराज देव ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ वाकसई यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.माघ पौर्णिमेच्या दिवशी गावात श्रींच्या पालखी मिरवणुक काढण्यात आली. ११ फेब्रुवारी रोजी भव्य अशा बैलगाडी स्पर्धा तर १३ फेब्रुवारी रोजी कुस्त्यांचा आखाडा चे आयोजन कारण्यात आले. करमणूकसाठी युवा लावणी सम्राज्ञी जुही शेरकर यांच्या फुल टू धमाल या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सलग तीन दिवस मोठ्या उत्साहामध्ये हा श्री वनोबा महाराजांचा उत्सव साजरा करण्यात आला. वाकसई ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने या उत्सवामध्ये सहभागी झाले होते.




